शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

महाविकास आघाडीत ज्याच्या जास्त जागा त्यांचा मुख्यमंत्री, नाना पटोले यांची उघड भूमिका

By कमलेश वानखेडे | Updated: April 26, 2023 13:24 IST

महाविकास आघाडी न झाल्यास सगळे प्लान तयार

नागपूर : महाविकास आघाडी व्हावी हा आमचा प्रयत्न आहे. महाविकास आघाडीत ज्याच्या जास्त जागा त्यांचा मुख्यमंत्री होईल. तसेच काही कारणांनी महाविकास आघाडी झाली नाही तर आमच्याकडे सगळे प्लान तयार आहेत, अशी स्पष्ट भूमिका मांडत काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादीला इशाराच दिला.

पटोले बुधवारी पत्रकारांशी बोलताना म्हणाले, मुख्यमंत्री ही जनता ठरवते. जनतेच्या मनात काय आहे हे निवडणुकीनंतर दिसेल. काँग्रेस ही जनतेचे प्रश्न घेऊन ताकदीने लढत आहे. राज्यात पहिल्या टप्प्यात काँग्रेस नेते राहूल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या सहा सभा होणार आहेत. सहाही विभागीय आयुक्त मुख्यालयाच्या ठिकाणी या सभा होतील. सातवी सभा मुंबईत असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कर्नाटकमध्ये एक्झिट पोलपेक्षा जास्त जागा मिळेल

- कर्नाटकच्या लोकांच्या मनात भाजपच्या विरोधात प्रचंड राग आहे. तानाशाह प्रवृत्तीच्या विरोधात उद्रेक कर्नाटकात सुरु झाला आहे. काँग्रेस हाच एकमेव पर्याय आहे. कर्नाटकमध्ये एक्झिट पोलपेक्षा जास्त जागा मिळेल, असा दावाही पटोले यांनी केला.

फायनरीच्या ठिकाणी सत्तेच्या बगलबच्यांनी जमिनी घेतल्या

- कोकणात रिफायनरी येणार तिथे सत्तेच्या बगलबच्यांनी जमिनी घेऊन ठेवल्या हा रिपोर्ट माझ्याकडे आहे. पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. सरकारने स्थानिकांचे मत ऐकून घ्यायला हवे. आमचा विकासाला, उद्योगाला विरोध नाही, असे सांगत लोकांसोबत बसून प्रश्न सोडवावा, अशी मागणी पटोले यांनी केली.

टॅग्स :PoliticsराजकारणNana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसMahavikas Aghadiमहाविकास आघाडीNCPराष्ट्रवादी काँग्रेस