शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत भाजप, शिंदेसेनेचे २०७ जागांवर एकमत, २० जागांचा तिढा; ठाण्यात १२ जागांवरून अडले घोडे; आज तोडगा शक्य
2
काँग्रेसचे ५ जानेवारीपासून ‘मनरेगा बचाव’ आंदोलन
3
आयुक्तांना विकले चक्क ११०० रुपयांना पूजेचे ताट! वेशांतरामुळे उघड झाला शनैश्वर देवस्थानातील प्रकार 
4
पालकमंत्री, आमदारांमध्ये संघर्ष; शिंदेसेना, राष्ट्रवादी देणार टक्कर 
5
चांदी ‘जीएसटी’सह अडीच लाख पार; १४,५०० वाढ
6
महामुंबईसाठी चित्रपट, नाट्यकलावंतांचा जाहीरनामा; महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काय म्हणतात कलाकार?
7
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
8
मूर्ती लहान, किर्ती महान! U19 वर्ल्ड कपआधी BCCI नं वैभव सूर्यवंशीकडे दिली थेट कॅप्टन्सीची जबाबदारी
9
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
10
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
11
India U19 Squad For ICC Men’s U19 World Cup : तोच पॅटर्न! अंडर १९ वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा
12
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
13
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
14
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
15
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
16
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
17
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
18
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
19
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
20
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
Daily Top 2Weekly Top 5

पोलिस ठाण्यामध्येच चोरी होत असेल तर कुठे जावे? २०२१ चा तक्रार अर्ज पोलीस ठाण्यातून चोरी

By योगेश पांडे | Updated: September 25, 2025 17:31 IST

Nagpur : सर्वसाधारणतः महत्त्वाचा ऐवज किंवा कागदपत्रांची चोरी झाल्यानंतर कुठलाही व्यक्ती पोलिस ठाण्यांमध्ये धाव घेते व तक्रार नोंदविते. मात्र जर पोलिस ठाण्यातीलच दस्तऐवजाची चोरी झाली तर...?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सर्वसाधारणतः महत्त्वाचा ऐवज किंवा कागदपत्रांची चोरी झाल्यानंतर कुठलाही व्यक्ती पोलिस ठाण्यांमध्ये धाव घेते व तक्रार नोंदविते. मात्र जर पोलिस ठाण्यातीलच दस्तऐवजाची चोरी झाली तर...? नागपुरातील परिमंडळ चारच्या जुन्या उपायुक्त कार्यालयातून एका व्यक्तीचा तक्रारींचा अर्ज चोरी गेला. या संदर्भात संबंधित व्यक्तीने पाठपुरावा केल्यानंतर अखेर पोलिसांनाच पोलिस कार्यालयातून अर्ज चोरीस गेल्याची तक्रार पोलिस ठाण्यातच नोंदवावी लागली.

अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. पोलिस उपायुक्त, परिमंडळ चारचे कार्यालय अगोदर अजनी येथील कांबळे चौकात होते. मारोतराव मोते (वय ७५) यांनी ५ ऑक्टोबर २०२१ रोजी परिमंडळ चारच्या उपायुक्त कार्यालयात फसवणुकीच्या प्रकरणात तक्रार केली होती. प्रक्रियेनुसार संबंधित तक्रारीचा अर्ज चौकशी होत असताना तेथेच असणे अपेक्षित होते. त्यानंतर काहीच दिवसांत त्या कार्यालयात रंगरंगोटी व सफाई करण्यात आली होती.

त्यानंतर कार्यालय हे सक्करदरा परिसरात स्थानांतरित झाले व तेथील सर्व दस्तऐवजदेखील तिथेच नेण्यात आले. मोते यांनी २०२० व जून २०२१ मध्ये हुडकेश्वर पोलिस ठाण्यात फसवणुकीच्या प्रकरणात तक्रार केली होती व गुन्हादेखील दाखल झाला होता. मात्र ऑक्टोबर २०२१ च्या तक्रारीवर हवी तशी कारवाई न झाल्याने त्यांनी विचारणा केली. मात्र संबंधित अर्जच कार्यालयात नसल्याची बाब समोर आली. याबाबत शोधाशोध सुरू झाली व तत्कालिन कार्यरत कर्मचारी-अधिकाऱ्यांना विचारणा झाली; परंतु तो अर्ज कुठेच सापडला नाही. प्रशासकीय प्रक्रियेनुसार पोलिस उपायुक्त कार्यालयात एखादा तक्रार अर्ज आल्यावर तो उपायुक्तांकडे जातो व ते संबंधित पोलिस ठाण्याकडे तो अर्ज वर्ग करण्याची सूचना करतात. मात्र संबंधित अर्जच न सापडल्याने अखेर तो अर्ज कार्यालयातूनच चोरीस गेल्याचा निष्कर्ष काढण्यात आला.

तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक राजू बस्तवाडे यांच्या तक्रारीवरून अजनी पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे पोलिस कार्यालयांमधील प्रशासकीय कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. वरकरणी हा प्रकार अगदी 3 सामान्य वाटत असला तरी यामुळे तक्रारदाराला झालेला मनस्ताप व पोलिस यंत्रणेतील त्रुटी प्रकर्षाने समोर आल्या आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Complaint Stolen From Police Station: Where to Seek Redressal?

Web Summary : In Nagpur, a complaint filed at a Deputy Commissioner's office was stolen. Despite follow-up, the document remained missing, forcing police to file a theft report within their own station, raising concerns about administrative processes.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूरPolice Stationपोलीस ठाणेPoliceपोलिस