शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

विमानतळाच्या ७,६०० कोटींचा प्रकल्प, विस्ताराचे काम नेमके थांबले कुठे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 14:37 IST

Nagpur : विदर्भाच्या विकासाचे प्रवेशद्वार मानल्या जाणाऱ्या नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ विस्तार प्रकल्पाला प्रशासकीय दिरंगाईचे ग्रहण लागले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भाच्या विकासाचे प्रवेशद्वार मानल्या जाणाऱ्या नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ विस्तार प्रकल्पाला प्रशासकीय दिरंगाईचे ग्रहण लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ८ ऑक्टोबर २०२४ रोजी या प्रकल्पाचे व्हर्चुअल भूमिपूजन झाले होते. मात्र, दीड वर्ष उलटूनही प्रत्यक्ष जमिनीवर एक वीटही रचली गेलेली नाही. ७,६०० कोटी रुपयांचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सध्या केवळ सरकारी फायलींमध्येच अडकून पडला आहे.

विमानतळाचे आधुनिकीकरण आणि संचालन 'जीएमआर समूहा'कडे सोपवण्याची प्रक्रिया अद्याप केंद्रीय कॅबिनेटच्या मंजुरीअभावी रखडली आहे. तसेच प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या जमिनीच्या हस्तांतरणाची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. डिसेंबर २०२५ पर्यंत हा प्रकल्प जीएमआरकडे सुपूर्द होणे अपेक्षित होते, मात्र आता ही मुदत उलटून गेली आहे. प्रकल्पासाठी निवडलेली कंपनी सध्या सरकारी प्रक्रिया पूर्ण होण्याची वाट पाहत असून, त्यामुळे विकासकामांना सुरुवात झालेली नाही. 

विदर्भाच्या विकासाला 'ब्रेक'

मिहान प्रकल्पाचा भाग असलेला हा विमानतळ विस्तार नागपूरला देशातील प्रमुख 'कार्गो हब' बनवण्यासाठी महत्त्वाचा आहे. या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार आणि गुंतवणुकीच्या संधी निर्माण होणार होत्या, मात्र सध्याच्या विलंबाचा मोठा फटका स्थानिक उद्योग क्षेत्राला बसत आहे.

विमानतळावर ५ कंपन्यांची सेवा

  • सध्या नागपूर विमानतळावरून ५ विमान कंपन्या सेवा देत आहेत. देशांतर्गत इंडिगो (सर्वाधिक उड्डाणे), एअर इंडिया (एअर इंडिया एक्स्प्रेससह) आणि स्टार एअर या कंपन्या सेवा देतात. तर आंतरराष्ट्रीय स्तरावर कतार एअरवेज आणि एअर अरेबिया या कंपन्या सेवा देतात.
  • विमानतळाचा विस्तार झाल्यास कनेक्टिव्हिटी वाढून नवीन २ आंतरराष्ट्रीय कंपन्या नागपुरात येण्याची शक्यता आहे, परंतु जुन्या पायाभूत सुविधांमुळे प्रवाशांना आणि व्यापाऱ्यांना सध्या अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
English
हिंदी सारांश
Web Title : Nagpur Airport's ₹7,600 Crore Expansion Stalled: Where Did the Project Stop?

Web Summary : Nagpur airport's ₹7,600 crore expansion, virtually launched in 2024, faces delays. Central cabinet approval and land transfer issues halt progress, impacting Vidarbha's development and cargo hub potential. Five airlines currently operate; expansion promises enhanced connectivity.
टॅग्स :nagpurनागपूर