शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठ्याच्या कामांचे करारनामे कधी पूर्ण होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 19:09 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा टंचाईची कामे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करण्याच्या सूचना केल्या आहेत. मात्र, अद्याप ग्राम पातळीवर कामासंदर्भातील करारनाम्याचे काम पूर्ण झाले नाही, त्यामुळे प्रत्यक्ष कामाला सुरुवात कधी होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

ठळक मुद्देमे महिना सुरू होऊनही टंचाईच्या कामांना सुरुवात नाही : सीमेलगतच्या गावांमध्ये टंचाईला सुरुवात

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : मे महिन्याला सुरुवात झाली आहे. त्याचसोबत ग्रामीण भागामध्ये पाण्याच्या टंचाईलाही सुरुवात झाली आहे. दरवर्षी उन्हाळ्यात निर्माण होणारी टंचाईची परिस्थिती लक्षात घेता, जिल्ह्याच्या टंचाई आराखड्यासाठी ३१ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा टंचाईची कामे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करण्याच्या सूचना केल्या आहेत. मात्र, अद्याप ग्राम पातळीवर कामासंदर्भातील करारनाम्याचे काम पूर्ण झाले नाही, त्यामुळे प्रत्यक्ष कामाला सुरुवात कधी होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने शासकीय कार्यालयांत कर्मचाऱ्यांची संख्या कमी केली होती. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून टंचाई आराखड्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली नव्हती. दरम्यान, शासनाने ही कामे ग्रामपंचायतींच्या माध्यमातून करण्यावर भर देण्याच्या सूचना केल्या. त्यासाठी ग्रामपंचायतीना ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या तालुकास्तरीय कार्यालयासोबत कामासंदर्भातील करारनामा करावा लागणार आहे. यानंतरच त्यांना त्यांच्या गावामध्ये पाणीपुरवठा योजनेची कामे करावी लागणार आहेत. यंदा जिल्ह्यात टंचाई आराखड्याच्या तीन टप्प्यांमध्ये ९०९ गावांमध्ये २६३ वर नळयोजना विशेष दुरुस्तीची कामे, ३८१ बोअरवेल, २ गावांमध्ये तात्पुरती पूरक नळयोजना, २१२ विहीर खोलीकरण, ८७ गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे, ५०३ गावांमध्ये खासगी विहीर अधिग्रहण करणे आदी कामे करावयाची आहेत. ही सर्व कामे करण्यासाठी ३० जूनपर्यंतची मुदत देण्यात येत असते. परंतु कोरोनामुळे सर्व कामे थांबली आहेत. त्यातच उन्हाळ्यामुळे शहर सीमेलगतच्या व ग्रामीण भागातील नागरिकांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे.शहर सीमेलगतच्या कामठी तालुक्यातील बिडगाव व तरोडी (खु.) या दोन गावांमध्ये गेल्या ३ एप्रिलपासून तीन टँकरद्वारे तेथील ग्रामस्थांची तहान भागविण्यात येत आहे. तर जिल्ह्यातील कुही, भिवापूर व नरखेड या तालुक्यांतील सुमारे १२ वर गावांमध्ये खासगी विहिरींचे अधिग्रहण करुन तेथील ग्रामस्थांना पाणी उपलब्ध करून दिले जात आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागात आजही पाण्याची ओरड आहेच. मात्र, ते शासकीय कागदोपत्री येऊ दिल्या जात नसल्याचा आरोप आता ग्रामीण जनतेकडून होत आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईnagpurनागपूर