शेतकऱ्यांच्या घामाला कधी मिळेल हवा तो दाम? आधीच पेरणीक्षेत्र घटले त्यात आयातही वाढली
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 13:23 IST2025-08-06T13:22:49+5:302025-08-06T13:23:02+5:30
देशात गेल्या पाच वर्षांत किती झाली कापसाची आयात-निर्यात

शेतकऱ्यांच्या घामाला कधी मिळेल हवा तो दाम? आधीच पेरणीक्षेत्र घटले त्यात आयातही वाढली
सुनील चरपे
नागपूर : कापसाचे पेरणी क्षेत्र देशात ३.३५ टक्क्यांनी, तर राज्यात ६.१२ टक्क्यांनी घटले आहे. त्यातच चालू कापूस हंगामाच्या पहिल्या आठ महिन्यांत २७ लाख गाठी कापसाची उच्चांकी आयात करण्यात आली. वाढती आयात व जागतिक पातळीवर दबावात असलेले दर विचारात घेता आगामी हंगामात कापसाचे दर ‘एमएसपी’च्या आसपास स्थिरावण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
देशात गेल्या पाच वर्षांत किती झाली कापसाची आयात-निर्यात
हंगाम आयात निर्यात
२०१९-२० १५.५० ४६.०४
२०२०-२१ ११.०३ ७७.५९
२०२१-२२ २१.०० ४३.००
२०२२-२३ १४.०० ३०.००
२०२३-२४ २२.०० २८.३६
२०२४-२५ २७.०० १८.००
(आयात-निर्यात लाख गाठींमध्ये)
कोणत्या देशातून किती कापसाची झाली आयात?
७.५०
ब्राझील
५.२५
अमेरिका
५.००
ऑस्ट्रेलिया
१.७९
माली
समाधानकारक दर मिळणार तरी कधी?
वर्ष दर एमएसपी
२०१९-२० ५,३८७ ५,५५०
२०२०-२१ ५,४३० ५,८२५
२०२१-२२ ८,९५८ ६,०२५
२०२२-२३ ७,७७६ ६,३८०
२०२३-२४ ७,३५० ७,०२०
२०२४-२५ ७,२५२ ७,५२१
(दर रुपये प्रतिक्विंटलमध्ये.)
दर ७,३०० रुपयांपर्यंत
चालू हंगामासाठी कापसाची एमएसपी ८,११० रुपये जाहीर केली आहे. सध्या मध्यम लांब धाग्याच्या रुईचे दर ५५,८०० ते ५६,५०० रुपये, तर लांब धाग्याच्या रुईचे दर ५६,६०० ते ५७,००० प्रतिखंडी आहेत.
सरकीचे दर ३,६०० ते ४,५४० रुपये प्रतिक्विंटलदरम्यान असल्याने कापसाला सरासरी ७,३०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. हेच दर आगामी तीन महिन्यांपर्यंत कायम राहण्याची शक्यता असून, सरकीचे दर कमी झाल्यास कापसाला प्रतिक्विंटल ७,२०० तर वाढल्यास ७,५०० रुपयांच्या आसपास दर मिळू शकताे.