शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
4
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
5
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
6
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
7
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
8
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
9
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
10
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
11
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
12
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
13
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
14
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
15
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
16
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
17
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
19
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
20
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

जागांचे हस्तांतरण कधी?

By admin | Updated: July 3, 2015 03:04 IST

जिल्हा परिषदेच्या अखत्यारित असलेल्या परंतु सातबारावर नोंदी नसलेल्या जनपदकालीन....

जिल्हा परिषद : कोट्यवधींच्या जागांचा शोध लागता लागेना गणेश हूड  नागपूर जिल्हा परिषदेच्या अखत्यारित असलेल्या परंतु सातबारावर नोंदी नसलेल्या जनपदकालीन जमिनी जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय ग्रामविकास विभागाने दोन वर्षभरापूर्वी घेतला. परंतु महसूल विभागाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने जमिनीचे हस्तांतरण अडकले आहे. जि.प.च्या निर्मितीनंतर जनपदकालीन जमिनीची मालकी जि.प.कडे असणे अपेक्षित होते. परंतु सातबारावर नाव न चढवल्याने अद्याप या जमिनींचा कायदेशीर मालकी हक्क आलेला नाही. अशा जमिनीचे सातबारावर नाव चढविण्यासाठी जि.प. प्रशासनाने मोहीम हाती घेतली होती. काही महिन्यानंतर ती थंड पडली. परंतु महसूल विभागाकडून प्रतिसाद न मिळाल्याने जि.प.चे अधिकारी वैतागले आहेत. जिल्ह्यातील १११ जमिनी जि.प.च्या ताब्यात असणे अपेक्षित होते. परंतु यातील ७२ जागा कब्जात आहेत. २५ जागा अद्याप जनपदच्या नावाने आहेत. काही जागांचा रेकॉर्ड अप्राप्त आहे. २९ जानेवारी २००४ च्या शासन निर्णयान्वये जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत यांच्याकडील स्थावर मालमत्तेचे अभिलेख तयार करणे व अद्यावत ठेवण्याची जबाबदारी उपमुख्यकार्यकारी अधिकारी यांच्यावर सोपविण्यात आलेली आहे. परंतु तांत्रिक बाबीमुळे जमिनीचे फेरफार अडकले आहे.नागपूर शहरातील बडकस चौक, झिंगाबाई टाकळी, वर्धा मार्गावरील साईमंदिरलगत, भामटी परसोडी, सुभाषनगर, हिंगणा रोड, पटवर्धन हायस्कूल अशा मोक्याच्या ठिकाणी जि.प.च्या जागा आहेत. सोन्याचा भाव असलेल्या यातील काही जागांवर अतिक्र मण झालेले आहे. परसोडी येथील १३ एक रपैकी काही जागेवर अतिक्र मण झाले आहे. हिंगणा मार्ग व झिंगाबाई टाकळी येथील जागेच्या काही भागात अतिक्र मण आहे. जि.प.ची मालकी पण ताबा दुसऱ्याचाजिल्ह्यातील जि.प.च्या मालक ीच्या १२१३ हेक्टर जमिनीवर दुसऱ्यांचा ताबा आहे. काही जागांचा व्यवसायासाठी वापर होतो. पैसा मात्र जि.प.तिजोरीत जमा होत नाही. उमरेड येथील जमिनीची परस्पर विल्हेवाट लावण्यात आली. कामठी तालुक्यातील आठ एकर जमीन क्रीडा संकुलासाठी देण्यात आली आहे. या जमिनीच्या मोबदल्यात तितकीच जमीन जि.प.ला मिळणे अपेक्षित होते, परंतु असे झाले नाही.इच्छाशक्तीचा अभावजि.प.च्या जागा सुरक्षित असाव्या, सातबारावर नोंदी व्हाव्या यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे. जि.प.अध्यक्ष निशा सावरकर व इतर पदाधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारल्यापासून या संदर्भात गंभीर नसल्याचे चित्र आहे. इच्छाशक्तीचा अभाव असल्याने तूर्त हा प्रश्न मार्गी लगण्याची शक्यता दिसत नाही.