शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
पोलिसांचे पोस्टमार्टेम कारनामे फलटणमध्येच नाहीत, शामलीमध्ये तर...; घरात चोरी झाली अन् डॉक्टर आंदोलनालाच बसले
3
डिजिटल इनव्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म Groww चा आयपीओ येणार; कधीपासून आणि किती करावी लागणार गुंतवणूक?
4
आधी भर रस्त्यात कोयता नाचवला, गाडी चालकांना धमकावलं, आता पोलिसांनी त्याच ठिकाणी गुडघ्यावर बसवलं; व्हिडीओ व्हायरल
5
बिहारच्या राजकारणात Gen Z उमेदवारांची चर्चा; मैथिली ठाकूरसह कोण-कोण मैदानात? पाहा...
6
'बारामतीला जायचंय; एक रात्र राहू द्या..', पीडितेची हॉटेलमधील 'ती' रात्र; पीडितेचा हॉटेलमधील घटनाक्रम..
7
Video - चमत्कार! ३ वर्षीय मुलीच्या अंगावरून गेली कार, पुढे जे झालं ते पाहून सर्वच हैराण
8
२३ वर्षांच्या मुलाला संपवलं अन् हायवेवर फेकला मृतदेह; तपासात आईच निघाली आरोपी! नेमकं काय झालं?
9
श्रेयस अय्यरची दुखापत ठरली टीम इंडियासाठी मोठा धक्का, इतके महिने तो राहणार क्रिकेटपासून दूर
10
शायनी आहुजा कुठे गायब झाला? व्हायरल होतोय अभिनेत्याचा फोटो; ओळखणंही झालं कठीण
11
रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितला श्रीमंत बनण्याचा मार्ग; म्हणाले, "आपल्या भावनांवर नियंत्रण...."
12
"दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही...", ममता कुलकर्णीचं अंडरवर्ल्ड डॉनवर वादग्रस्त विधान
13
सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
14
लाडकी बहीण योजना: २६ लाख अपात्र महिला, ४ हजार कोटींची खैरात; सरकारी तिजोरीवर मोठा आर्थिक भार
15
ऑनर किंलिंग प्रकरणात २० वर्षांची शिक्षा, तुरुंगातून सुटला, आता दोषी आरोपीचा अपघाती मृत्यू
16
स्वप्न साकार! नोकरी नाकारली अन् शेती केली; आता कमावते १ कोटी, ३० जणांना दिला रोजगार
17
तुमच्या पगारात किती महागडे घर खरेदी करावे? तज्ज्ञांनी सांगितले 'हे' ४ महत्त्वाचे नियम; EMI किती असावा?
18
२५ नोव्हेंबरला राम मंदिरात दर्शन बंद राहणार, PM मोदी अयोध्येला जाणार; ८ हजार निमंत्रणे गेली
19
पारंपरिक श्रद्धा, लोककला आणि आधुनिकतेचा संगम; ‘गोंधळ’च्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता
20
तब्बल ६ वर्षांनंतर भेटले डोनाल्ड ट्रम्प अन् शी जिनपिंग; दक्षिण कोरियात चालली २ तासांची बैठक!

उद्योग गेल्याचे वडेट्टीवार यांना कुठल्या सुत्रांनी सांगितले

By कमलेश वानखेडे | Updated: September 19, 2024 16:56 IST

उद्योगमंत्री उदय सामंत यांचा टोला : विभागाकडे अशी कुठलिही नोंद नाही

नागपूर : विदर्भात किती उद्योग आले याकडे कदाचित विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांचे लक्ष नसावे. पूर्व आणि पश्चिम विदर्भात अनेक प्रकल्प, उद्योगांना आणण्यात सरकार यशस्वी झालेले आहे. कुठल्या सुत्रांनी त्यांना उद्योग गेल्याची माहिती दिली, असा सवाल करीत उद्योग मंत्री उदय सामंत यांनी वडेट्टीवार यांना टोला लगावला. उद्योग मंत्री म्हणून आपल्याकडे अशी कुठेही नोंद नाही. प्रधान सचिव यांच्याकडून माहिती घेण्यासाठी सूचना दिल्या आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

गुरुवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना उद्योगमंत्री सामंत म्हणाले, देशातील पहिला सेमीकंडक्टर उद्योगाचे उद्घाटन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत झाले. परकीय गुंतवणुकीमध्ये मागील काळात मागे असलेला महाराष्ट्र सगळ्यांना मागे टाकून आता पुढे चाललेला आहे. महाराष्ट्र विदेशी गुंतवणुकीत एक नंबरवर आहे आणि राहील, असा दावा त्यांनी केला.

बेताल वक्तव्य करणाऱ्यांनी संयम ठेवावा

बेताल वक्तव्य करणाऱ्यांनी संयम ठेवला पाहिजे. महायुती म्हणून निवडणुकीला समोर जाताना आपली मते कमी होणार नाही, प्रत्येक पक्षाच्या घटक पक्षाच्या सगळ्यांनी याची काळजी घेतली पाहिजे, असा सल्ला सामंत यांनी दिला.

तिकीट वाटप सन्मान जनक होईलमहायुतीतील तिकीट वाटप सन्मान जनक होईल. सन्मान जनकचा आकडा किती असेल यावर बोलणे मात्र उदय सामंत यांनी टाळले. तिसऱ्या आघाडीच्या शक्यतेबाबत विचारणा केली असता ते म्हणाले, कुठली आघाडी झाली तरी महाविकास आघाडीचा पराभव अटळ आहे. दोन महिन्यानंतर मी जेव्हा नागपूरला येईल तेव्हा महायुतीचा सरकार सत्तेत आलेले असेल. सगळ्यांना स्वतंत्र निर्णय घेऊन आघाडी करण्याचे अधिकार आहे.

शरद पवारांचे एका दगडात तीन पक्षी...मुख्यमंत्री कोण या विषयावर पंधरा दिवसापूर्वी शरद पवार महत्त्वाचे बोलले. त्यांनी एका दगडात तीन पक्षी मारलेले आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भानावर यावे. संख्याबळ असल्यावरच मुख्यमंत्री कोण होईल हे ठरवता येईल. निवडून आल्यानंतर कोण मुख्यमंत्री हे ठरवू, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारUday Samantउदय सामंतnagpurनागपूर