‘मुख्यमंत्र्यांनी जरांगे यांना काय बरे आश्वासन दिले?’

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2023 09:00 IST2023-09-15T09:00:02+5:302023-09-15T09:00:22+5:30

Nagpur: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटील यांच्या कोणत्या मागण्या मान्य केल्या आहेत, असा सवाल राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी केला आहे. 

'What did the Chief Minister promise to Jarange?' | ‘मुख्यमंत्र्यांनी जरांगे यांना काय बरे आश्वासन दिले?’

‘मुख्यमंत्र्यांनी जरांगे यांना काय बरे आश्वासन दिले?’

नागपूर - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटील यांच्या कोणत्या मागण्या मान्य केल्या आहेत, असा सवाल राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी केला आहे.   कुणबी ओबीसी आंदोलन कृती समितीतर्फे संविधान चौक येथे पाच दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी जरांगे यांनी केली होती, ती मागणी सरकारने मान्य केली का? तसे नसेल तर सरकारने ते लेखी स्पष्ट करावे, तोवर आमचे आंदोलन सुरू राहील. मुख्यमंत्र्यांनी नागपुरात येऊन ओबीसींचीही बाजू जाणून घ्यावी, असेही तायवाडे म्हणाले. 

 

 

Web Title: 'What did the Chief Minister promise to Jarange?'