शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

नागपुरात सिमेंट रोडच्या प्रकल्प अहवालावर उधळपट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2018 11:47 PM

विकास कामांसाठी नागरिकांकडून कर वसूल केला जातो. परंतु या पैशाचा दुरुपयोग सुरू असल्याचा प्रत्यय सोमवारी आला. स्थायी समितीच्या बैठकीत तिसऱ्या  टप्प्यातील सिमेंट रोडची निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेला प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी खासगी कंपनीला ८४ लाख देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.

ठळक मुद्देसिमेंट रोड टप्पा तीन : ८४ लाखांच्या खर्चाला मंजुरी : वर्षभरात पाचवेळा निविदा

आॅनलाईन लोकमतनागपूर : विकास कामांसाठी नागरिकांकडून कर वसूल केला जातो. परंतु या पैशाचा दुरुपयोग सुरू असल्याचा प्रत्यय सोमवारी आला. स्थायी समितीच्या बैठकीत तिसऱ्या  टप्प्यातील सिमेंट रोडची निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेला प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी खासगी कंपनीला ८४ लाख देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट असल्याने नगरसेवकांना प्रभागातील विकास कामांच्या फाईल मंजुरीसाठी चकरा माराव्या लागत आहे. दुसरीकडे तिसऱ्या  टप्प्यातील कामाला सुरुवात झालेली नसतानाही फक्त अहवाल तयार करण्यासाठी ८४ लाख खर्च करण्यात येणार आहे.वर्षभरात तिसऱ्या  टप्प्यातील सिमेंट रोडच्या निविदा पाचवेळा काढण्यात आल्या. पाचव्यांदा अहवाल तयार करण्यासाठी पुणे येथील मे. इन्फ्राकिंग कन्सल्टींग इंजिनिअरिंग प्रा. लि. या कंपनीला ०.२३४ टक्के कमी दराने काम करण्याला मंजुरी देण्यात आली. तिसऱ्या  टप्प्यात ३०० कोटींच्या रस्त्यांची कामे केली जाणार आहेत. दहापैकी पाच पॅकेजच्या निविदा तयार करण्यात आल्या आहेत. यासाठी कंपनीला ८४ लाखांची रक्कम देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.सिमेंट रोडची कामे अद्याप सुरू झालेली नाही. लोकनिर्माण विभागाने आपल्या प्रस्तावात प्रकल्पावरील खर्च वाढवून रक्कम मंजूर करण्याचा प्रस्ताव दिला होता. सिमेंट रोडची जबाबदारी असलेल्या कार्यकारी अभियंता एम.जी. कुकरेजा व मुख्य अभियंता विजय बनगीरवार यांनी अर्ध्याच सिमेंट रोडच्या निविदा काढल्या असतानाही कंत्राटदाराला रक्कम देण्याची शिफारस केली आहे. परंतु समितीने यावर कोणताही आक्षेप नोंदविला नाही.एका कंपनीने सादर केलेल्या दस्तऐवजात मिक्सर मशीन, ड्रम असल्याचे नमूद केले आहे. परंतु ट्रक असल्याचा कुठेही उल्लेख नाही. कंपनीने सादर केलेले अनुभवाचे प्रमाणपत्र संशयास्पद आहे, असे असतानाही या कंपनीची निविदा मंजूर करण्यात आली. अशा परिस्थितीत सिमेंट रोडच्या गुणवत्तेची अपेक्षा न केलेली बरी, अशी महापालिकेत चर्चा आहे.चार वॉटर फायर टेंडरचे फेब्रिकेशनदोन हजार लिटरची क्षमता असलेले चार वॉटर फायर टेंडरच्या फेब्रिकेशनचे काम मे. वाडिया बॉडी बिल्डर, अहमदाबाद यांना ८० लाखांना देण्याच्या प्रस्तावाला ७ नोव्हेंबर २०१७ रोजी स्थायी समितीने मंजुरी दिली होती. परंतु सुधारित प्रस्तावात शुल्क वेगवेगळे द्यावयाचे आहे. यामुळे आर्थिक बोजा वाढण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाnagpurनागपूर