खरेदीसाठी मार्केटमध्य गेल्या, महिलेचा १०.६० लाखांचा मुद्देमाल लंपास

By दयानंद पाईकराव | Updated: May 29, 2024 16:20 IST2024-05-29T16:17:44+5:302024-05-29T16:20:16+5:30

नागपूर : पती आणि मुलांसह मार्केटमध्ये खरेदीसाठी गेलेल्या महिलेच्या घरातील १० लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात आरोपीने चोरून ...

Went to the market for shopping, lost goods worth 10.60 lakhs of the woman in nagpur | खरेदीसाठी मार्केटमध्य गेल्या, महिलेचा १०.६० लाखांचा मुद्देमाल लंपास

खरेदीसाठी मार्केटमध्य गेल्या, महिलेचा १०.६० लाखांचा मुद्देमाल लंपास

नागपूर : पती आणि मुलांसह मार्केटमध्ये खरेदीसाठी गेलेल्या महिलेच्या घरातील १० लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात आरोपीने चोरून नेला. ही घटना जरीपटका पोलिस ठाण्याच्या हद्दीत २६ मे रोजी रात्री ८.३० ते २७ मे रोजी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान घडली. इंद्रप्रीत कौर इंदरजितसिंग बावरा (३७, रा. सुशीलाबाई ले आऊट, सुगतनगर) या पती व मुलांसह मार्केटमध्ये गेल्या होत्या. त्यांच्या सासु गुरुद्वारा येथे गेल्या होत्या.

अज्ञात आरोपीने त्यांच्या घरात प्रवेश करून घरातील आलमारीतील लॉकर बाजुलाच असलेल्या चावीने उघडले. आरोपीने लॉकरमधील सोन्याचे दागिने असलेला डबा व रोख २ लाख रुपये असा एकुण १० लाख ६० हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. इंद्रपीतकौर यांनी दिलेल्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम ३८० नुसार गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.

Web Title: Went to the market for shopping, lost goods worth 10.60 lakhs of the woman in nagpur