कुटुंबासह देवदर्शनाला गेले, चोरट्याने १.८२ लाखांचे दागीने नेले
By दयानंद पाईकराव | Updated: May 27, 2024 16:18 IST2024-05-27T16:17:15+5:302024-05-27T16:18:42+5:30
Nagpur : अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

Went to Devdarshan with family, thief took away jewelry worth 1.82 lakhs
नागपूर : कुटुंबासह मथुरा येथे देवदर्शनासाठी गेलेल्या व्यक्तीच्या घरातील १ लाख ८२ हजार २८० रुपये किमतीचे दागीने अज्ञात आरोपीने चोरुन नेले. ही घटना १९ मे रोजी सकाळी ९.३० ते २४ मे रोजी सकाळी ९ वाजताच्या दरम्यान हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.
जितेंद्र गणेश आराकडे (३८, रा. गिताई ले आऊट, उप्पलवाडी, नारी) हे आपल्या राहत्या घराला कुलुप लाऊन कुटुंबीयांसह मथुरा येथे देवदर्शनासाठी गेले होते. त्यांना शेजारी राहणारे त्यांच्या मामाने घराचे कुलुप तुटलेले असून चोरी झाल्याची माहिती मोबाईलवर कळविली. जितेंद्र २६ मे रोजी परत आल्यानंतर त्यांनी घराची पाहणी केली असता अज्ञात आरोपीने त्यांच्या घराच्या मुख्य दाराचे कुलुप तोडून घरातील बेडरुममधील आलमारीतील सोन्याचे दागीने किंमत १ लाख ८२ हजार २८० रुपये चोरून नेल्याचे समजले. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम ४५४, ४५७, ३८१ नुसार गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.