कॉलेजला गेला अन् घरी मृतदेहच पोहोचला; भरधाव ट्रकच्या धडकेत विद्यार्थ्याचा मृत्यू
By जितेंद्र ढवळे | Updated: August 18, 2023 17:59 IST2023-08-18T17:58:21+5:302023-08-18T17:59:46+5:30
भरधाव ट्रक बनून आला काळ

कॉलेजला गेला अन् घरी मृतदेहच पोहोचला; भरधाव ट्रकच्या धडकेत विद्यार्थ्याचा मृत्यू
नागपूर : कॉलेज आटोपून घरी जात असलेल्या विद्यार्थ्याच्या दुचाकीला विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रकने धडक दिली. यात दानिश प्रवीण नगरकर (१८,रा. मनसर, ता. रामटेक) या विद्यार्थ्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना पारशिवनी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आमडी फाटा ते पारशिवनी महामार्गावरील ‘परमात्मा एक’ आश्रमाजवळ गुरुवारी घडली. दानिश हा पारशिवनी येथील केसरीमल पालीवाल विद्यालय व कनिष्ठ मगविद्यालयाचा १२ वी विज्ञान शाखेत शिकत होता.
नेहमीप्रमाणे गुरुवारी कॉलेज आटोपून दानिश त्याच्या दुचाकी क्रं. एम एच ४०, डी.बी. ०६१७ ने पारशिवनी कडून मनसर कडे जात होता. अशातच आमडी फाट्याकडून पारशिवनीकडे येणाऱ्या ट्रक क्रमांक एम. एच .४० सी. डी. ३७६५ ने परमात्मा एक आश्रम जवळ दुचाकीस धडक दिली. यात दानिशचा घटनास्थळीच मृत्यू झाला.