कुटुंबासह चिमुरला गेले, चोरट्याने ७.१८ लाखाचे दागिने लांबविले

By दयानंद पाईकराव | Updated: February 24, 2024 19:10 IST2024-02-24T19:10:10+5:302024-02-24T19:10:22+5:30

अज्ञात आरोपीने घराच्या मुख्य दाराचे कुलुप तोडून आत प्रवेश केला. 

Went to Chimur with family thief stole jewelery worth 7 lakhs | कुटुंबासह चिमुरला गेले, चोरट्याने ७.१८ लाखाचे दागिने लांबविले

कुटुंबासह चिमुरला गेले, चोरट्याने ७.१८ लाखाचे दागिने लांबविले

नागपूर : घराला कुलुप लाऊन कुटुंबासह चिमुर येथे गेलेल्या व्यक्तीच्या घरातील ७.१८ लाखांचे सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या आरोपीविरुद्ध अजनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अनिरुद्ध दिनकर पिंपळापुरे (६२, रा. अभयनगर रामेश्वरी रिंग रोड) हे २२ फेब्रुवारीला सायंकाळी ७.३० ते २३ फेब्रुवारीला सकाळी ८ दरम्यान आपल्या घराला कुलुप लाऊन कुटुंबासह चिमुर येथे गेले होते. अज्ञात आरोपीने त्यांच्या घराच्या मुख्य दाराचे कुलुप तोडून आत प्रवेश केला. 

आरोपीने दोन लोखंडी आलमारीतील सोन्या-चांदीचे दागिने व रोख ६ हजार असा एकुण ७ लाख १८ हजार ७६७ रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. या प्रकरणी पिंपळापुरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून अजनी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.

Web Title: Went to Chimur with family thief stole jewelery worth 7 lakhs

टॅग्स :nagpurनागपूर