कुटुंबासह अमरावतीला गेले, इकडे चोरट्याने रोख, दागिने पळवले
By दयानंद पाईकराव | Updated: September 23, 2023 15:28 IST2023-09-23T15:26:18+5:302023-09-23T15:28:16+5:30
अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

कुटुंबासह अमरावतीला गेले, इकडे चोरट्याने रोख, दागिने पळवले
नागपूर : कुटुंबासह अमरावतीला गेलेल्या व्यक्तीच्या घरातील सोन्या-चांदीचे दागिने व रोख असा एकुण ९६ हजाराचा मुद्देमाल पळविणाऱ्या आरोपीविरुद्ध अंबाझरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
संदिप रामचंद्र कुंभरे (वय ३४, रा. राधे डेअरीजवळ न्यु फुटाळा) हे २१ सप्टेंबरला रात्री आठ वाजता ते २२ सप्टेंबरला सकाळी सहा दरम्यान आपल्या घराच्या मुख्य दाराला कुलुप लाऊन कुटुंबासह अमरावतीला गेले होते. अज्ञात आरोपीने त्यांच्या घराचे कुलुप तोडून आत प्रवेश केला. आरोपीने घरातील सोन्या-चांदीचे दागिने व रोख ६ हजार असा एकुण ९६ हजाराचा मुद्देमाल चोरून नेला. कुंभरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून अंबाझरी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम ४५७, ३८० नुसार गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरु केला आहे.