देवदर्शनासाठी गेले, घर फोडून ३.२५ लाखांचे दागिने नेले

By दयानंद पाईकराव | Updated: May 4, 2024 22:46 IST2024-05-04T22:46:25+5:302024-05-04T22:46:36+5:30

नागपूर : देवदर्शनासाठी गेलेल्या व्यक्तीचे घर फोडून अज्ञात आरोपीने ३ लाख २५ हजार रुपयांचे दागीने चोरून नेले. ही घटना ...

Went for Devdarshan broke into a house and took jewelry worth 3.25 lakhs | देवदर्शनासाठी गेले, घर फोडून ३.२५ लाखांचे दागिने नेले

देवदर्शनासाठी गेले, घर फोडून ३.२५ लाखांचे दागिने नेले

नागपूर : देवदर्शनासाठी गेलेल्या व्यक्तीचे घर फोडून अज्ञात आरोपीने ३ लाख २५ हजार रुपयांचे दागीने चोरून नेले. ही घटना वाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुरुवार २ मे ते ३ मे २०२४ दरम्यान घडली. कृष्णकुमार नरसैय्या (७०, रा. प्लॉटनं. ३४, रतन विहार कॉलनी, वाडी) हे आपल्या घराला कुलुप लावून कुटुंबियांसह चंद्रपूर येथे देवदर्शनासाठी गेले होते. अज्ञात आरोपीने त्यांच्या घराच्या मुख्य दाराचे कुलुप तोडून घरात प्रवेश केला. आरोपीने लोखंडी आलमारीतील सोन्या-चांदीचे दागीने व रोख ११ हजार असा एकुण ३ लाख २५ हजार ४७० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. नरसैय्या यांनी दिलेल्या तक्रारीवरून वाडी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम ४५४, ४५७, ३८० नुसार गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरु केला आहे.

Web Title: Went for Devdarshan broke into a house and took jewelry worth 3.25 lakhs

टॅग्स :nagpurनागपूर