फुलपाखरांच्या नव्या दाेन प्रजातींचे नागपुरात स्वागत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 10:55 IST2021-02-18T10:53:53+5:302021-02-18T10:55:07+5:30

Nagpur News नागपूर क्षेत्रात फुलपाखरांची संख्या सातत्याने वाढत आहे. नुकतेच संत्रानगरीत फुलपाखरांच्या दाेन नव्या प्रजातींची नाेंद करण्यात आली आहे.

Welcome to Nagpur for new species of butterflies | फुलपाखरांच्या नव्या दाेन प्रजातींचे नागपुरात स्वागत 

फुलपाखरांच्या नव्या दाेन प्रजातींचे नागपुरात स्वागत 

ठळक मुद्देपाम झाडांच्या आयातीचे परिणाम

निशांत वानखेडे

 लोकमत न्यूज नेटवर्क  

नागपूर : लाॅकडाऊनमुळे झालेल्या गाेष्टींचे काही सुखद परिणाम पर्यावरणात दिसायला लागले आहे. नागपूर क्षेत्रात फुलपाखरांची संख्या सातत्याने वाढत आहे. नुकतेच संत्रानगरीत फुलपाखरांच्या दाेन नव्या प्रजातींची नाेंद करण्यात आली आहे. इंडियन पाम फ्लाय व जाॅयंट रेड आय अशी या दाेन प्रजातींची नावे आहेत. यांच्या आगमनाने शहरात फुलपाखरांच्या प्रजातींची संख्या १५१ वर पाेहचली आहे.

फुलपाखरू अभ्यासक डाॅ. आशिष टिपले यांनी या दाेन प्रजातींची नाेंद घेतली आहे. महाराष्ट्राच्या पश्चिम घाटात या प्रजाती आढळून येतात. पश्चिम घाटातील पाम झाडांवर या फुलपाखरांचा अधिवास असताे, त्यामुळे त्यांना पाम फ्लाय असे नाव देण्यात आले आहे. साैंदर्यीकरणासाठी या झाडांची आयात सर्वत्र केली जाते. अशाचप्रकारे विदर्भात झाडे आणल्याने त्या झाडांवर राहिलेल्या या प्रजातीच्या लार्व्हामुळे त्यांचे इकडे आगमन झाले. अनुकूल वातावरणामुळे त्यांची वाढ झाली असण्याची शक्यता डाॅ. टिपले यांनी व्यक्त केली. आता पाम फ्लायची विदर्भात बऱ्यापैकी वाढ झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यापूर्वी चंद्रपूर, ताडाेबा व पेंचच्या परिसरात पाम फ्लाय आढळून आले व अभ्यासकांनी याची नाेंद घेतली हाेती.

काॅमन पाम फ्लाय

वैज्ञानिक नाव : एलिम्नियस हायपरम्नेस्ट्रा

वर्णन : पंख गडद तपकिरी रंगाचे असतात. समाेरच्या पंखाच्या बाॅर्डरवर गडद निळ्या रंगाचे ठिपके असतात. नरामध्ये ते अधिक असतात. मागील पंख लालसर तपकिरी असतात. कधीकधी पंखाच्या मधाेमध पांढरे ठिपकेही आढळून येतात.

जाॅयंट रेड आय

वैज्ञानिक नाव : मटापा एरीया

वर्णन : नावाप्रमाणेच डाेळे माेठे आणि भडक लाल असतात. मादीचे पंख गडद चाॅकलेटी तपकिरी रंगाचे तर नराचे पंख हलक्या तपकिरी रंगाचे असतात. पाेटाचा भागही तपकिरी रंगाचा असताे. पापणीचे केस पिवळसर पांढरे असतात.

२००९ नंतर पहिल्यांदा एवढी वाढ

डाॅ. टिपले यांनी सांगितले, नागपुरात २००९ पर्यंत १४५ प्रजातींची अधिकृत यादी तयार करण्यात आली हाेती. त्यानंतर आता २०२० मध्ये त्यात चार प्रजातीची भर पडली. आता पुन्हा नव्या दाेन प्रजाती आढळल्याने संख्या १५१ वर पाेहचली आहे. याप्रमाणेच विदर्भातही फुलपाखरांच्या प्रजातींची संख्या १७६ वरून १८० वर पाेहचल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Welcome to Nagpur for new species of butterflies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.