गृहमंत्री शाह नागपुरात अन प्रदेशाध्यक्षांकडून स्वागत

By योगेश पांडे | Updated: October 10, 2023 16:15 IST2023-10-10T16:14:47+5:302023-10-10T16:15:02+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे मंगळवारी दुपारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. तेथून ...

Welcome by Home Minister Shah Nagpur and State President | गृहमंत्री शाह नागपुरात अन प्रदेशाध्यक्षांकडून स्वागत

गृहमंत्री शाह नागपुरात अन प्रदेशाध्यक्षांकडून स्वागत

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे मंगळवारी दुपारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. तेथून ते तेलंगणा येथील आदिलाबादमधील एका कार्यक्रमासाठी हेलिकॉप्टरने रवाना झाले. शाह यांच्या स्वागताला प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे हे विमानतळावर पोहोचले होते.

शाह नागपुरात येणार असल्याची माहिती सोमवारी रात्री भाजपच्या पदाधिकाऱ्यांना मिळाली. त्यानंतर धावपळ करत शहरातील पदाधिकाऱ्यांना सूचित करण्यात आले. शाह मंगळवारी आदिलाबाद येथील सार्वजनिक सभेला दुपारी चार वाजता संबोधित करणार होते. त्यासाठी ते अगोदर नागपुरात पोहोचले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळावर त्यांचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,आ. मोहन मते,नागपूर पोलीस आयुक्त अमितेश कुमार,सहपोलिस आयुक्त अश्वती दोरजे, अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय पाटील, पोलीस उपायुक्त विजयकांत सागर यांनी स्वागत केले. त्यानंतर लगेच शाह आदिलाबादसाठी रवाना झाले.
 

Web Title: Welcome by Home Minister Shah Nagpur and State President