आपच्या दिल्ली विजयाचे नागपुरात स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 14:58 IST2020-02-11T14:57:37+5:302020-02-11T14:58:07+5:30
दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने केलेल्या आघाडीचा आनंद नागपुरात आपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषात साजरा केला.

आपच्या दिल्ली विजयाचे नागपुरात स्वागत
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने केलेल्या आघाडीचा आनंद नागपुरात आपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषात साजरा केला. ढोलताशाच्या ठेक्यावर ताल धरत आप कार्यकर्त्यांनी आपला आनंद व्यक्त केला. उपराजधानीतील आपचे नेते देवेंद्र वानखडे यांनी, दिल्लीत आपच्या ६० हून अधिक जागा अपेक्षित होत्या. मात्र आपल्या देशातील नागरिक भाबड्या मनाचे आहेत. केजरीवालांना मते दिली तर पाकिस्तानला पाठिंबा दिल्यासारखे होईल असा त्यांनी समज करून घेतला आणि आपच्या काही जागा कमी झाल्या. दिल्लीतील जे कट्टर हिंदुत्ववादी नागरिक आहेत त्यांनी या निवडणुकीत आपच्या पाठिशी उभे राहण्याचे नाकारले. अन्यथा अधिक जागांवर विजय मिळविता आला असता असे मत व्यक्त केले आहे.