शरजील उस्मानीचे वक्तव्य तपासल्यानंतरच कारवाई करू, गृहमंत्र्यांची नागपुरात माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2021 12:46 IST2021-02-01T12:45:18+5:302021-02-01T12:46:10+5:30

Nagpur News  पुण्यातील एल्गार परिषदेत बोलताना शरजील उस्मानी याने हिंदु समाजाबद्दल केलेले आक्षेपार्ह वक्तव्य तपासल्यानंतर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती गृहमंत्री अनिल देेशमुख यांनी येथे माध्यमांशी बोलताना दिली.

We will take action only after checking the statement of Sharjeel Usmani, informed the Home Minister in Nagpur | शरजील उस्मानीचे वक्तव्य तपासल्यानंतरच कारवाई करू, गृहमंत्र्यांची नागपुरात माहिती

शरजील उस्मानीचे वक्तव्य तपासल्यानंतरच कारवाई करू, गृहमंत्र्यांची नागपुरात माहिती

 लोकमत न्यूज नेटवर्क  
 

नागपूर: पुण्यातील एल्गार परिषदेत बोलताना शरजील उस्मानी याने हिंदु समाजाबद्दल केलेले आक्षेपार्ह वक्तव्य तपासल्यानंतर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती गृहमंत्री अनिल देेशमुख यांनी येथे माध्यमांशी बोलताना दिली. अलीगढ मुस्लिम विद्यापीठाचा माजी विद्यार्थी असलेल्या शरजील उस्माने याने हिंदु समाज सडला आहे, असे आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. या संदर्भात विचारले असता त्याच्या भाषणाचा व्हिडीओ बोलावला आहे. त्याची रितसर तपासणी करू. त्या नंतर काही आक्षेपार्ह आढळले तर कारवाई करू, असे देशमुख म्हणाले. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या दौऱ्याचा भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेसला फायदाच होईल, असे ते म्हणाले.

Web Title: We will take action only after checking the statement of Sharjeel Usmani, informed the Home Minister in Nagpur