अर्थखाते अजित पवारांकडे नकोच..; बच्चू कडू स्पष्टच बोलले

By कमलेश वानखेडे | Published: July 12, 2023 01:47 PM2023-07-12T13:47:55+5:302023-07-12T13:50:40+5:30

शिंदे गटातील आमदार अस्वस्थ

We don't want Ajit Pawar as a finance minister; Bachchu Kadu spoke clearly | अर्थखाते अजित पवारांकडे नकोच..; बच्चू कडू स्पष्टच बोलले

अर्थखाते अजित पवारांकडे नकोच..; बच्चू कडू स्पष्टच बोलले

googlenewsNext

नागपूर : शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादीची एन्ट्री झाली. त्यामुळे शिंदे गटातील आमदारांना असुरक्षित वाटू लागले आहे. यावरून सरकारमध्ये कुठेतरी मोठी नाराजी आहे. सर्व घडामोडी अचानक झाल्या. त्यामुळे चिंतेचा विषय आहेच. अर्थ मंत्रालय अजित पवारांकडे जाऊ नये, ही शिंदे गटातील आमदारांची मागणी आहे. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये अजित पवार हे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदारांना झुकते माप द्यायचे. आताही तेच होणार आणि इतर आमदारांकडे दुर्लक्ष करणार. त्यामुळे अर्थमंत्री पदी अजित पवार नकोच, अशी ठाम भूमिका पुन्हा एकदा आ. बच्चू कडू यांनी मांडली.

नागपुरात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, मंत्रिमंडळ विस्तारानंतर तीन इंजिनच्या सरकारमध्ये बिघाडसुद्धा होऊ शकतो. विस्तारानंतर आमदारांची नाराजी दूर करण्याचं मोठे आव्हान सरकारसमोर असणार आहे. बऱ्याच आमदारांना मंत्रिपदाची अपेक्षा आहे. पण तिसरा आल्याने त्यांच्या वाट्याला काही मंत्रीपदे गेली. त्यामुळे आधी आलेल्या आमदारांवर अन्याय होणारच आहे. राष्ट्रवादी आपल्या घासातला घास खात आहे, अशी आमदारांची भावना झाली आहे. त्यामुळे आपला नंबर कटला, तर नाराजी असणारच आहे. कुणाला कोणते खातं द्यायचे, पालकमंत्रिपदी कोणत्या जिल्ह्याचे कुणाला द्यायचे, अशा अनेक भानगडी आहेत. शिंदे गटाला किती मंत्रिपदे मिळतील, याची मला कल्पना नाही, पण तिन्ही नेत्यांनी चांगल्या पद्धतीने सरकार चालवले तर महायुती घट्ट होईल, असेही त्यांनी सांगितले.

आमदार मुंबईत डेरेदाखल, मी मात्र गावी चाललो...

- मंत्रीमंळात आपला नंबर लावाला या आशेने बरेच आमदार मुंबईत डेरेदाखल झाले आहेत. मी मात्र आपल्या गावी निघालो आहे. माझ्यात व त्यांच्यात हाच फरक आहे. मुंबईत राहिलो म्हणजेच मंत्रीपद मिळते असे नाही, असेही बच्चूकडू म्हणाले. आपल्याला कुठल्याही पालकमंत्रिपदाची अपेक्षा नाही. जी जबाबदारी आली, ती पार पाडू, पण मंत्रिपदासाठी अद्याप फोन आलेला नाही, असेह त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: We don't want Ajit Pawar as a finance minister; Bachchu Kadu spoke clearly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.