शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

नागपुरात जलसंकटाचे सावट : तलाव, धरणात अल्पसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 12:08 AM

नागपूरसह संपूर्ण विभागावर पाणी संकट येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. विभागातील जलाशयांमध्ये केवळ १७ टक्के पाणी शिल्लक आहे. उन्हाळा अद्याप सुरू झाला नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात भीषण पाणी समस्या भेडसावण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ठळक मुद्दे१७ टक्केच जलसाठा शिल्लक : मध्य प्रदेश सरकारला पत्र

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूरसह संपूर्ण विभागावर पाणी संकट येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. विभागातील जलाशयांमध्ये केवळ १७ टक्के पाणी शिल्लक आहे. उन्हाळा अद्याप सुरू झाला नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात भीषण पाणी समस्या भेडसावण्याची शक्यता नाकारता येत नाही.विभागात ३७२ लघु, मध्यम व मोठे जलप्रकल्प आहेत. त्यांची एकूण क्षमता ४५९३.९ दशलक्ष घनमीटर आहे. सध्या या प्रकल्पांत केवळ ७९१.३९ दशलक्ष घनमीटर पाणी उपलब्ध आहे. १८ मोठ्या प्रकल्पांमध्ये ३५५४ च्या तुलनेत केवळ १६ टक्के, म्हणजे ५६९ दशलक्ष घनमीटर पाणी उरले आहे. तसेच, ४० मध्यम प्रकल्पांत २१ टक्के तर, ३१ लघु प्रकल्पांत २० टक्के जलसाठा आहे. पेंच प्रकल्पाची परिस्थिती चिंताजनक आहे.पाणी संकटातून मार्ग काढण्यासाठी प्रशासन सक्रिय झाले आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांना पत्र लिहून चौराई धरणातील ५ एमएलडी पाणी पेंचमध्ये सोडण्याची मागणी केली आहे. मध्य प्रदेश सरकारने यावर अद्याप सकारात्मक उत्तर दिले नाही. त्यामुळे बावनकुळे यांनी यासंदर्भात कमलनाथ यांची भेट घेण्याचा निर्णय घेतला आहे.भूजलाचा आधारजलाशयांमध्ये केवळ १७ टक्के पाणी शिल्लक असले तरी उन्हाळ्यात जास्त पाणी कपात केली जाणार नाही असे जाणकारांचे म्हणणे आहे. परंतु, येणारा पावसाळा असमाधानकारक राहिल्यास परिस्थिती बिघडेल. विभागात भूजलाची अवस्था चांगली आहे. जल संकटावर त्यामुळे मात करता येईल असे जाणकारांचे मत आहे.पाणी काटकसरीने वापरामहापालिकेतर्फे महिनाभरापूर्वी घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत पालकमंत्री बावनकुळे यांनी नागरिकांना पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन केले होते. सोबतच महापालिकेला पाण्याच्या गळतीचे प्रमाण कमी करण्याचा सल्ला दिला होता. त्यावेळीच भविष्यात भीषण जलसंकटाला सामोरे जावे लागू शकते, हे स्पष्ट झाले होते. आता महापालिकेला संभाव्य टंचाईचा धोका लक्षात घेता वेळीच उपाय योजावे लागणार आहेत.निवडणुकीच्या तोंडावर पाणी पेटणारलोकसभेची निवडणूक एप्रिल- मे मध्ये होईल. हे उन्हाळ्याचे दिवस असतील. दरवर्षीच तशीही उन्हाळ्यात पाणी टंचाई निर्माण होते. मात्र, हा निवडणुकीचा काळ असल्यामुळे पाणी टंचाईचे ‘राजकीय’ चटके बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सत्तापक्ष भाजपाची चिंता वाढणार आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईnagpurनागपूर