घरात पाणी शिरले, ७० वर्षाच्या वृद्धेचा मृत्यू; गिट्टीखदानच्या महेशनगरातील घटना

By दयानंद पाईकराव | Published: September 23, 2023 08:35 PM2023-09-23T20:35:36+5:302023-09-23T20:36:13+5:30

शुक्रवारी रात्री झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे घरात पाणी शिरुन एका ७० वर्षाच्या वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची घटना गिट्टीखदान पोलिस ठाण्यांतर्गत महेशनगरात घडली.

water enters house 70 year old dies incidents in mahesh nagar of gittikhadan nagpur | घरात पाणी शिरले, ७० वर्षाच्या वृद्धेचा मृत्यू; गिट्टीखदानच्या महेशनगरातील घटना

घरात पाणी शिरले, ७० वर्षाच्या वृद्धेचा मृत्यू; गिट्टीखदानच्या महेशनगरातील घटना

googlenewsNext

दयानंद पाईकराव, नागपूर: शुक्रवारी रात्री झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे घरात पाणी शिरुन एका ७० वर्षाच्या वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची घटना गिट्टीखदान पोलिस ठाण्यांतर्गत महेशनगरात घडली.

मीरा  कप्पूस्वामी (वय ७०, रा. प्लॉट नं. ९८, महेशनगर, गिट्टीखदान ),  असे मृत्यू झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर आलेल्या मुसळधार पावसाचे पाणी मिरा कप्पूस्वामी यांच्या घरात शिरले. आजारी असल्यामुळे त्या घरात झोपलेल्या होत्या. पावसाचे पाणी घरात शिरल्याचे त्यांना कळले नाही. पाण्याची पातळी वाढत गेल्यामुळे मीरा यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. शुक्रवारी सकाळी सहा वाजताच्या सुमारास त्या घरातील पाण्यावर
तरंगताना दिसून आल्या. त्यांना पोलिसांनी उपचाराकरिता मेयो हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी फिर्यादी दिलीप जियालाल कनोजिया (वय ६३ ) यांनी दिलेल्या सूचनेवरून गिट्टीखदान पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.
 

Web Title: water enters house 70 year old dies incidents in mahesh nagar of gittikhadan nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.