वॉटर एटीएम बनले शो-पीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:07 IST2020-12-08T04:07:48+5:302020-12-08T04:07:48+5:30
वॉटर एटीएमसाठी महापालिकेने आपल्या तिजोरीतून प्रत्यक्ष खर्च केला नाही. परंतु जागा उपलब्ध केली. ओसीडब्ल्यूकडून पाणी उपलब्ध केले जाणार ...

वॉटर एटीएम बनले शो-पीस
वॉटर एटीएमसाठी महापालिकेने आपल्या तिजोरीतून प्रत्यक्ष खर्च केला नाही. परंतु जागा उपलब्ध केली. ओसीडब्ल्यूकडून पाणी उपलब्ध केले जाणार होते. मीटरनुसार पाणी शुल्क आकारले जाणार होते. मशीन स्वयंसंचालित असल्याने कंपनी वीज मीटर घेतले. परंतु काही ठिकाणी पाणी व वीज मीटर लागलेच नाही. अशी स्थिती देवडिया स्कूल येथील एटीएमची आहे.
....
माफक दरात पाणी उपलब्ध झालेच नाही
शहरातील पादचाऱ्यांना व गरजूंना एक लिटर पाण्याच्या बॉटलसाठी २० ते २५ रुपये मोजावे लागतात. वॉटर एटीएममुळे गरजूंना माफक दरात शुद्ध पाणी उपलब्ध व्हावे, हा या योजनेमागचा हेतू होता. मात्र लागलेले एटीएम बंद पडल्याने शुद्ध व थंड पाण्याचे स्वप्न भंगले. यासंदर्भात जलप्रदाय विभागाच्या कार्यकारी अभियंता श्वेता बॅनर्जी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रतिसाद मिळाला नाही.
...
आरओ वॉटर प्युरिफायरही बंद
नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे, यासाठी शहरात आठ ठिकाणी ‘आरओ’ वॉटर प्युरिफायर उभारण्याचे काम मनपाने वॉटर हेल्थ इंडियाच्या माध्यमातून हाती घेतले आहे. यात जिल्हाधिकारी कार्यालय, महाल, पन्नालाल देवडिया स्कूल, शहीद चौक इतवारी, मोरभवन या सहा ठिकाणी उभारण्यात आले. परंतु मागील आठ महिन्यापासून आरओ वॉटर बंद आहेत.
....
योजना कागदावरच, प्रशासनाचे दुर्लक्ष
लोकोपयोगी योजनांचा मोठा गाजावाजा केला, परंतु त्याची अंमलबजावणी होत नाही. असाच प्रकार वॉटर एटीएम व आरओ वॉटरच्याबाबतीत घडला. प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
तानाजी वनवे, विरोधी पक्षनेते, मनपा