शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
3
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
4
"मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
5
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
6
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
7
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
8
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
9
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
10
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
11
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
12
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
13
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
14
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
15
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
16
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
17
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
18
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
19
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
20
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद

संसर्गप्रसारास प्रतिबंध करण्यासाठी हात धुवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2018 8:15 PM

इस्पितळांमध्ये संसर्गप्रसारास प्रतिबंध करण्याचा सर्वाधिक परिणामकारक मार्ग म्हणजे योग्यप्रकारे हात धुणे हा आहे. जर तुम्ही रुग्ण असाल तर तुमचे मित्र, कुटुंबिय तसेच आरोग्य सेवा प्रदाते यांना आपापले हात धुण्याची आठवण करुन द्या, असा सल्ला डॉ. समीर पलतेवार यांनी दिला.

ठळक मुद्देसंसर्ग नियंत्रण सप्ताहाला सुरूवात

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : इस्पितळांमध्ये संसर्गप्रसारास प्रतिबंध करण्याचा सर्वाधिक परिणामकारक मार्ग म्हणजे योग्यप्रकारे हात धुणे हा आहे. जर तुम्ही रुग्ण असाल तर तुमचे मित्र, कुटुंबिय तसेच आरोग्य सेवा प्रदाते यांना आपापले हात धुण्याची आठवण करुन द्या, असा सल्ला डॉ. समीर पलतेवार यांनी दिला.संसर्ग नियंत्रण सप्ताला ५ मार्चपासून सुरूवात झाली. यानिमित्ताने आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. या प्रसंगी डॉ. अतूल राजकोंडावार, डॉ. अश्विनी तायडे व डॉ. अनघा देशमुख उपस्थित होत्या. डॉ. पलतेवार म्हणाले, भारतात दरवर्षी इस्पितळामध्ये संसर्ग फैलावल्यामुळे अनेक रुग्णांचा जीव धोक्यात येतो. या पार्श्वभूमीवर संसर्गजन्य आजारांना प्रतिबंध करण्यासाठी संसर्ग नियंत्रण सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. हे सहावे वर्ष आहे. ५ ते ११ मार्चपर्यंत चालणाºया या सप्ताहात प्रति जैविक प्रतिरोध, हवेतून पसरणारे संक्रमण, स्पर्शाने होणारे संक्रमण टाळण्यासाठी घेण्यात येणारी दक्षता, जंतू नाशके, निर्जंतुकीकरण, जैविक कचरा या सारख्या विषयांवर परिसंवाद, भित्ती पत्रक, रांगोळी स्पर्धा यासह विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ७ मार्च रोजी प्रति जैविके जनजागृती या विषयावर झीरो माईल ते मेडिट्रीना इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सपर्यंत रॅली काढण्यात येईल. या रॅलीला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हिरवी झेंडी दाखवतील, असेही ते म्हणाले.विषाणूची प्रतिकार शक्ती वाढणे धोक्याचेएकूण रुग्णांपैकी साधारण ५० टक्के रुग्णांना आवश्यक्ता नसतानाही प्रतिजैविक औषधांची मात्रा दिली जाते. त्यामुळे रुग्णांच्या शरीरातील विषाणूंची प्रतिकार शक्ती वाढते. काही रुग्णांना औषध सेवन केल्यावरही आराम मिळत नाही. हा धोका टाळण्यासाठी त्वरित प्रतिजैविक औषधांचे अनावश्यक वाटप टाळण्याची गरज आहे. सध्या नव्या प्रतिजैविक औषधांची निर्मिती बंद आहे. यामुळे प्रत्येकाने याचा वापर काळजीपूर्वक करणे, याची जनजागृती करणे व संक्रमण होणार याकडे लक्ष देणे आवश्यक आहे, असेही डॉ. पलतेवार म्हणाले.

टॅग्स :doctorडॉक्टरHealthआरोग्य