शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

फडणवीसांना पुन्हा मुख्यमंत्री करायचेय! बावनकुळेंचे विधान, राजकीय चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2022 05:38 IST

बावनकुळे यांनी फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्याचे विधान केल्यानंतर शिंदे गटात कुजबुज सुरू झाली आहे. 

नागपूर : सोमवारपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत असून त्याआधीच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री करण्याचे विधान केल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. एकीकडे फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात येणाऱ्या निवडणुका लढविण्याचे वक्तव्य केले होते तर आता बावनकुळे यांनी फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्याचे विधान केल्यानंतर शिंदे गटात कुजबुज सुरू झाली आहे. 

संत जगनाडे महाराज पुण्यतिथी सोहळ्याच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीतच बावनकुळे यांनी हे वक्तव्य केले. बावनकुळे म्हणाले, महाराष्ट्राचं भविष्य केवळ देवेंद्र फडणवीस बदलू शकतात. फडणवीस हे जाती-पातीच्या पलीकडे गेलेले नेते आहेत. २०२४ मध्ये फडणवीसांना पुन्हा मुख्यमंत्री करू, असे सुतोवाच त्यांनी केले. किमान मी भाजपचा प्रदेशाध्यक्ष असेपर्यंत फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजेत, असे ते म्हणाले. 

भाजप कार्यकारिणी, कोअर कमिटीची आज बैठक

  • भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची तसेच कोअर कमिटीची बैठक सोमवारी नागपुरात होणार आहे. 
  • या बैठकांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राचे प्रभारी सी. टी. रवी, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आदी उपस्थित राहतील. सुरुवातीला प्रदेश कार्यकारिणीची बैठक होईल. त्यानंतर सायंकाळी कोअर कमिटीची बैठक होणार आहे.
टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेBJPभाजपाMaharashtraमहाराष्ट्र