शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
2
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
3
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
4
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
5
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
6
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
7
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
8
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
9
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
10
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
11
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
12
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
13
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
14
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
16
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
17
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
18
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
19
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
20
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."

आईस गोला खाताय? आधी हे वाचा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 11:15 AM

आईसगोला, कुल्फी, निंबूसरबत, उसाचा रस आदींमध्ये अखाद्य म्हणजे उद्योगांसाठी वापरल्या जाणाऱ्या बर्फाचा सर्रास वापर होत आहे. हा बर्फ अमोनिया वायू व दूषित पाण्याद्वारे तयार होत असल्याने शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

ठळक मुद्देआरोग्य धोक्यातआईसगोला, कुल्फी, सरबतमध्ये सर्रास वापर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कमी भांडवलात बक्कळ नफा कमवायच्या मोहात काही व्यापाऱ्यांनी अक्षरश: नागरिकांच्या जीवाशी खेळ मांडला आहे़ शहरात रस्त्यारस्त्यांवर विकल्या जाणारा आईसगोला, कुल्फी, निंबूसरबत, उसाचा रस आदींमध्ये अखाद्य म्हणजे उद्योगांसाठी वापरल्या जाणाऱ्या बर्फाचा सर्रास वापर होत आहे. हा बर्फ अमोनिया वायू व दूषित पाण्याद्वारे तयार होत असल्याने शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे.उपराजधानीचे तापमान ४३ अंशापर्यंत गेले आहे. अंगाची लाही लाही होऊ लागली असताना कोल्डड्रिंक, रसवंती, निंबूशरबत, आइस्क्र ीम व ज्यूस सेंटरवर गर्दी वाढू लागली आहे. एखादा बर्फाचा गोळेवाला अथवा सरबतवाला समोर आला तर त्याची चव चाखल्याशिवाय पुढे जावेसे वाटत नाही. मात्र, रस किंवा अन्य पेयांत टाकण्यात येणारा बर्फाचा खडा कुठून येतो किंवा तो कसा तयार होतो, त्याठिकाणी आरोग्यदायी वातावरण आहे अथवा नाही याची कुणीच खातरजमा करत नाही. शहरात बर्फ तयार करणाऱ्या कंपन्या ‘कूलिंग’साठीच अखाद्य बर्फ तयार करतात. केवळ दोनच कंपन्या ‘आईसक्यूब’ तयार करतात. हा महागडा बर्फ असल्याने याचा वापर मोठे हॉटेल्स, बीअरबार येथेच होतो. कूलिंगसाठी वापरण्यात येणारा बर्फच आपल्याकडे मोठ्या प्रमाणात खाण्यासाठी वापरला जात असल्याचे वास्तव आहे. अखाद्य बर्फ बनविणाऱ्या कंपन्या आपला बर्फ मोठ्या आकाराचा व्हावा व तो फार काळ टिकावा यासाठी अमोनियाचा वापर करतात. त्यांच्या जोडीला विविध वायू आणि दूषित पाणी असते. हा बर्फ दूध, मासे आणि रासायनिक उत्पादनाना थंडावा (कूलिंग) देण्यासाठी तयार केला जातो. या बर्फातील सर्वच घटक आरोग्याच्या दृष्टीने फार घातक असतात, असे असतानाही अन्न औषध प्रशासनाच्या नाकावर टिच्चून औद्योगिक वापरासाठी असलेल्या बर्फाची खाद्यपदार्थ म्हणून विक्री होत आहे.

फूटपाथवर विकला जातो बर्फशहरातील अनेक महत्त्वाच्या चौकातील फूटपाथवर सर्रास बर्फाची विक्री होते. बर्फ साठवण्याची ही जागा अत्यंत गलिच्छ असते. बर्फाला ऊन लागू नये म्हणून तो ठेवण्याच्या जागेवर अंथरली जाणारी पोती तसेच बर्फाच्या लाद्यांना गुंडाळली जाणारी पोती अत्यंत घाणेरडी असतात. वितळणाऱ्या बर्फाचे पाणी पोत्याखाली साठून चिखल व नंतर डबके तयार होते. तरी बर्फ दिवसभर त्यातच असतो. हा सगळा प्रकार रोगराई पसरवणारा असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे. बहुसंख्य आईस गोलावाले, कुल्फीवाले, निंबू शरबत व उसाचा रसवाले येथून हा बर्फ घेऊन जातात.

टॅग्स :Healthआरोग्य