मोटारने पावसाचे पाणी काढताना करंट लागून वेटरचा मृत्यू

By दयानंद पाईकराव | Updated: September 24, 2023 20:17 IST2023-09-24T20:14:24+5:302023-09-24T20:17:16+5:30

मोटार पंप लाऊन हॉटेलमध्ये घुसलेले पावसाचे पाणी बाहेर काढताना करंट लागून एका वेटरचा मृत्यू झाला.

waiter was electrocuted while collecting rainwater with a motor | मोटारने पावसाचे पाणी काढताना करंट लागून वेटरचा मृत्यू

मोटारने पावसाचे पाणी काढताना करंट लागून वेटरचा मृत्यू

नागपूर : मोटार पंप लाऊन हॉटेलमध्ये घुसलेले पावसाचे पाणी बाहेर काढताना करंट लागून एका वेटरचा मृत्यू झाला. ही घटना धंतोली पोलिस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी दुपारी २.२० वाजताच्या सुमारास घडली. कृष्णकुमार लेखराम बरखंडी (वय २१, रा. राणी डोंगरी जमबाडा, जि. बेतुल) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.

धंतोली पोलिस ठाण्याच्या हद्दीत यशवंत स्टेडियम येथे गणेश सागर हॉटेलमध्ये पावसाचे पाणी शिरले होते. कृष्णकुमार मोटार पंप लाऊन पावसाचे पाणी बाहेर काढत होते. त्यांना इलेक्ट्रीक करंट लागल्यामुळे ते बेशुद्ध होऊन त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी समीर ताज मोहम्मद अंसारी (वय ३५, रा. वांजरा ले आऊट) यांनी दिलेल्या सुचनेवरून धंतोलीचे उपनिरीक्षक भाग्यवान नन्नावरे यांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरु केला आहे.

Web Title: waiter was electrocuted while collecting rainwater with a motor