बोहल्यावर चढण्यापूर्वी केले मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:12 IST2020-12-02T04:12:49+5:302020-12-02T04:12:49+5:30
कोरोनोबाधिताने बजावला हक्क पदवीधर मतदार असलेल्या एका कोरोनाबाधित रुग्णाने लोकशाहीला बळकट करण्यासाठी ‘स्व’विचारांनाही ‘पॉझिटिव्ह’करीत भिवापूर येथे मतदानाचा हक्क बजाविला. ...

बोहल्यावर चढण्यापूर्वी केले मतदान
कोरोनोबाधिताने बजावला हक्क
पदवीधर मतदार असलेल्या एका कोरोनाबाधित रुग्णाने लोकशाहीला बळकट करण्यासाठी ‘स्व’विचारांनाही ‘पॉझिटिव्ह’करीत भिवापूर येथे मतदानाचा हक्क बजाविला. आनंद रामस्वरूप गुप्ता, रा. भिवापूर असे या मतदाराचे नाव आहे. गुप्ता हे भिवापूरचे नगरसेवक व भाजपचे माजी शहर अध्यक्ष आहेत. चार दिवसांपूर्वी गुप्ता यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यामुळे त्यांनी स्वत:ला क्वारंटाईन करून घेत उपचार सुरू केले. दरम्यान, पॉझिटिव्ह रुग्णांसाठी निवडणूक आयोगाने ठरविलेल्या आरक्षित वेळेत सायंकाळी ४ ते ५ वाजताच्या दरम्यान गुप्ता हे पीपीई किट, मास्क, हॅण्ड ग्लोव्हज परिधान केलेल्या पोशाखात तहसील कार्यालयातील मतदान केंद्रावर पोहोचले आणि मतदानाचा हक्क बजावला.
नरखेडचे मतदान कोराडीत
पदवीधर मतदार संघासाठी भारसिंगी येथील मतदान केंद्रावर २०५ पैकी १४७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. या केंद्रावर मतदार यादीतील चुकीबद्दल घोळ दिसून आला. नरखेड तालुक्यातील बहुतांश मतदारांचे मतदान कोराडी (ता. कामठी) येथे असल्यामुळे मतदारांना त्रास सहन करावा लागला. आधीच कारोनाचे संकट आणि त्यात मतदान करायला कोराडीला जाणे मतदारांना अवघड झाले. त्यामुळे ज्यांना शक्य झाले त्यांनी कोराडी येथे जाऊन मतदान केले.