शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मतदारांचे मत सुरक्षित नाही; नाना पटोले यांचा आरोप

By कमलेश वानखेडे | Updated: January 25, 2025 18:23 IST

Nagpur : ६० लाख मते कुठून वाढली

कमलेश वानखेडे, नागपूर लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विधानसभा निवडणुकीत मतदानानंतर जारी झालेली आकडेवारी व मतदानाच्या दुसऱ्या दिवशी निवडणूक आयोगाने दिलेल्या आकडेवारीत तब्बल ६० लाख मतांची तफावत आहे. ही वाढीव मते कुठून आली याचे निवडणूक आयोगाने अद्याप उत्तर दिलेले नाही. मतदारांचे मत सुरक्षित नाही, असे चित्र निर्माण झाले असून निवडणूक आयोग लोकशाहीचा खून करीत आहेत, अशी टीका काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

पटोले शनिवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना म्हणाले, काँग्रेसने देशभरात २५ जानेवारी रोजी मतदार दिन साजरा केला. मतदाराला जागृत करण्याचा हा एक प्रयत्न आहे. मतदानाच्या दिवशी सायंकाळी ६ नंतर तब्बल ७६ लाख मतदान झाले. एवढे मतदान कुठल्या बूथवर झाले याची माहिती आयोग द्यायला तयार नाही. निवडणूक आयोग कोणासाठी काम करताे हे स्पष्ट झाले आहे. या विरोधात आता आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ, असेही त्यांनी सांगितले. सरकार सांगते की बांगलादेशी मतदारांनी फायदा घेतला, तर मग पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने बांगलादेशी मतदारांना भारतात आणले का, असा सवाल पटोले यांनी केला. नागपूरच्या अधिवेशनात यावर प्रश्न निर्माण झाला तेव्हा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निवडणूक आयोगाची वकिली करत होते, अशी टीका पटोले यांनी केली.

बावनकुळे यांना अडचण काय?

आम्ही निवडणूक आयोगाला प्रश्न विचारतो तर चंद्रशेखर बावनकुळे यांना का त्रास होतो, असा सवाल करीत वेळ ताकदवर असते, आज त्यांचा दिवस आहे, उद्या आमचा दिवस असेल, असा इशाराही त्यांनी दिला. भाजपची सदस्यत्वासाठी मिस कॉल सिस्टिम आहे. विधानसभेत उमेदवारीसाठी काँग्रेसकडे सर्वांत जास्त अर्ज आले होते. भाजपचे लोकही तिकीट मागायला आमच्याकडे आले होते, असा दावाही पटोले यांनी केला.निवडणुका लागणार का?उद्धव ठाकरे यांनी एकला चलोची भूमिका सांगितली. आम्ही त्यांचे स्वागत केले. यावर शरद पवार यांनीही भूमिका मांडली आहे. मुळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागतील का, हा प्रश्न आहे. आधी निवडणूक लागू द्या मग आम्ही कसं लढायचे ते ठरवू, असेही पटोले यांनी सष्ष्ट केले. मी प्रदेश अध्यक्षपद सोडले आहे. मी हायकामांडला सांगितले आहे, असेही पटोले यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेnagpurनागपूर