मतदारांचे मत सुरक्षित नाही; नाना पटोले यांचा आरोप

By कमलेश वानखेडे | Updated: January 25, 2025 18:23 IST2025-01-25T18:20:32+5:302025-01-25T18:23:21+5:30

Nagpur : ६० लाख मते कुठून वाढली

Voters' votes are not safe; Nana Patole alleges | मतदारांचे मत सुरक्षित नाही; नाना पटोले यांचा आरोप

Voters' votes are not safe; Nana Patole alleges

कमलेश वानखेडे, नागपूर 
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
विधानसभा निवडणुकीत मतदानानंतर जारी झालेली आकडेवारी व मतदानाच्या दुसऱ्या दिवशी निवडणूक आयोगाने दिलेल्या आकडेवारीत तब्बल ६० लाख मतांची तफावत आहे. ही वाढीव मते कुठून आली याचे निवडणूक आयोगाने अद्याप उत्तर दिलेले नाही. मतदारांचे मत सुरक्षित नाही, असे चित्र निर्माण झाले असून निवडणूक आयोग लोकशाहीचा खून करीत आहेत, अशी टीका काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

पटोले शनिवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना म्हणाले, काँग्रेसने देशभरात २५ जानेवारी रोजी मतदार दिन साजरा केला. मतदाराला जागृत करण्याचा हा एक प्रयत्न आहे. मतदानाच्या दिवशी सायंकाळी ६ नंतर तब्बल ७६ लाख मतदान झाले. एवढे मतदान कुठल्या बूथवर झाले याची माहिती आयोग द्यायला तयार नाही. निवडणूक आयोग कोणासाठी काम करताे हे स्पष्ट झाले आहे. या विरोधात आता आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ, असेही त्यांनी सांगितले. सरकार सांगते की बांगलादेशी मतदारांनी फायदा घेतला, तर मग पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने बांगलादेशी मतदारांना भारतात आणले का, असा सवाल पटोले यांनी केला. नागपूरच्या अधिवेशनात यावर प्रश्न निर्माण झाला तेव्हा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निवडणूक आयोगाची वकिली करत होते, अशी टीका पटोले यांनी केली.

बावनकुळे यांना अडचण काय?

आम्ही निवडणूक आयोगाला प्रश्न विचारतो तर चंद्रशेखर बावनकुळे यांना का त्रास होतो, असा सवाल करीत वेळ ताकदवर असते, आज त्यांचा दिवस आहे, उद्या आमचा दिवस असेल, असा इशाराही त्यांनी दिला. भाजपची सदस्यत्वासाठी मिस कॉल सिस्टिम आहे. विधानसभेत उमेदवारीसाठी काँग्रेसकडे सर्वांत जास्त अर्ज आले होते. भाजपचे लोकही तिकीट मागायला आमच्याकडे आले होते, असा दावाही पटोले यांनी केला.

निवडणुका लागणार का?
उद्धव ठाकरे यांनी एकला चलोची भूमिका सांगितली. आम्ही त्यांचे स्वागत केले. यावर शरद पवार यांनीही भूमिका मांडली आहे. मुळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागतील का, हा प्रश्न आहे. आधी निवडणूक लागू द्या मग आम्ही कसं लढायचे ते ठरवू, असेही पटोले यांनी सष्ष्ट केले. मी प्रदेश अध्यक्षपद सोडले आहे. मी हायकामांडला सांगितले आहे, असेही पटोले यांनी स्पष्ट केले.
 

Web Title: Voters' votes are not safe; Nana Patole alleges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.