नागपूर : सुधारणा व पुनर्वसन हे महाराष्ट्र कारागृहाचे ब्रीद असून कारागृहातील बंद्यांसाठी विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यात येतात. याच शृंखलेत पूर्व विभागाच्या कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांच्या मार्गदर्शनाखाली रोटरी क्लब ऑफ नागपूर मिहान टाऊन व मध्यवर्ती कारागृहाच्या संयुक्त विद्यमाने महिला बंद्यांसाठी विविध प्रकारच्या व्यावसायिक प्रशिक्षणाची सुरुवात करण्यात आली.
प्रशिक्षणाच्या उद्घाटन समारंभाला जिल्हा कौशल्य विकास रोजगार व स्वयंरोजगार सहायक आयुक्त प्रभाकर हरडे, महिला आर्थिक विकास महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक राजू इंगळे, वरिष्ठ जिल्हा समन्वयक डॉ. रंजन वानखेडे, जिल्हा प्रशिक्षक जगदिश ठाकूर, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा समन्वयक प्रियंका कपले, रोटरी क्लब ऑफ नागपूर मिहान टाऊनचे अध्यक्ष हिमांशू ठाकूर, दिपल ठाकर, प्रशिक्षक ऊर्मिल पाटणकर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी कारागृहातून सुटल्यानंतर महिला बंद्यांसाठी महिला आर्थिक विकास महामंडळ तसेच जिल्हा कौशल्य विकास विभागातर्फे सुरू असलेल्या योजनांची माहिती दिली. तसेच महिला बंद्यांना स्वयंरोजगाराबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला कारागृह अधीक्षक अनुपकुमार कुमरे, उपअधीक्षक दीपा आगे, तुरुंगाधिकारी माया धतुरे उपस्थित होत्या.
............