शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

भाजपसाठी विवेक ओबेरॉय व स्मृती इराणी मैदानात

By admin | Updated: October 13, 2014 01:12 IST

विधानसभा निवडणूक प्रचाराच्या अंतिम टप्प्यात रविवारी नागपुरात अभिनेता विवेक ओबेरॉय व केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी भाजप उमेदवारांसाठी प्रचार सभा घेतल्या. केंद्राप्रमाणे

नागपुरातील उमेदवारांचा प्रचार : महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन करण्याचे आवाहननागपूर : विधानसभा निवडणूक प्रचाराच्या अंतिम टप्प्यात रविवारी नागपुरात अभिनेता विवेक ओबेरॉय व केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी भाजप उमेदवारांसाठी प्रचार सभा घेतल्या. केंद्राप्रमाणे महाराष्ट्रातही सत्ता परिवर्तन करण्याचे आवाहन त्यांनी केले. दक्षिण-पश्चिम नागपूर मतदार संघातील भेंडे ले-आऊ ट येथे आयोजित जाहीर सभेत बोलताना विवेक ओबेरॉय म्हणाले, येथील रेशीमबागच्या पाण्यात जादू असून त्यात दिल्लीतील सत्ता हलविण्याची ताकद आहे. लोकसभा निवडणुकीत विदर्भात भाजपला ६-७ जागा मिळतील, असा सर्वेक्षणाचा अंदाज होता. परंतु सर्वच्यासर्व १० जागांवर विजय मिळाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रात स्पष्ट बहुमतात भाजपचे सरकार सत्तेत आले. आता तसेच महाराष्ट्रातही परिवर्तन घडवून आणा व भाजपच्या हातात सत्ता द्या. महाराष्ट्रात सर्वत्र भ्रष्टाचार बोकाळला असल्याने विधानसभा निवडणुकीत भाजपला १५०ते १६० मिळतील. भाजपची स्वबळावर सत्ता आल्यास गुजरातप्रमाणे महाराष्ट्राचाही विकास होईल, असा विश्वास ओबेरॉय यांनी व्यक्त केला. यावेळी आमदार अनिल सोले यांनीही मार्गदर्शन केले. मनपाच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष संदीप जोशी, किशोर वानखेडे, नितीन तेलगोटे, विजय राऊ त आदी व्यासपीठावर उपस्थित होते.जाटतरोडी येथे आयोजित जाहीर सभेत स्मृती इराणी म्हणाल्या, महाराष्ट्र गत १५ वर्षांपासून वनवास भोगत आहे. परंतु आता येत्या १५ आॅक्टोबर रोजी तो संपणार आहे. मात्र त्यासाठी महाराष्ट्रात परिवर्तन हवे आहे. तीच परमेश्वराची इच्छा आहे. निवडणुकीनंतर लगेच दिवाळी उत्सव सुरू होणार आहे. यंदाच्या या उत्सवात लक्ष्मी ही कमळावर बसून घरोघरी येणार आहे. यावर्षीची दिवाळी ही लोकशाहीची दिवाळी राहणार आहे.राजकारण हे सेवेचे माध्यम बनले पाहिजे. भाजपची सत्ता येणार असल्याने सध्या काँग्रेस व राष्ट्रवादी दोन्ही पक्ष चिंतेत पडले आहे. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष व दक्षिण-पश्चिम विधानभा मतदार संघातील भाजप उमेदवार देवेंद्र फडणवीस यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या नेत्या सुलेखा कुुंभारे व संदीप जोशी उपस्थित होते. (प्रतिनिधी)