प्रदेश काँग्रेसच्या सोशल मीडिया प्रभारीपदी विशाल मुत्तेमवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2021 21:01 IST2021-10-19T21:00:39+5:302021-10-19T21:01:45+5:30

Nagpur News काँग्रेसचे युवा नेते विशाल मुत्तेमवार यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सोशल मीडिया विभागाच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Vishal Muttemwar in charge of social media of Pradesh Congress | प्रदेश काँग्रेसच्या सोशल मीडिया प्रभारीपदी विशाल मुत्तेमवार

प्रदेश काँग्रेसच्या सोशल मीडिया प्रभारीपदी विशाल मुत्तेमवार

नागपूर : काँग्रेसचे युवा नेते विशाल मुत्तेमवार यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सोशल मीडिया विभागाच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सोशल मीडियाच्या माध्यामातून काँग्रेसची ध्येय धोरणे जनतेपर्यंत पोहचविण्यासोबतच विरोधी पक्षांकडून होणाऱ्या विखारी प्रचारालाही उत्तर देण्याची जबाबदारी त्यांच्यावर आली आहे. विशाल हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव असून, यापूर्वी त्यांनी युवक काँग्रेसचेही महासचिवपद भूषवले आहे. याशिवाय अखिल भारतीय काँग्रेस समितीचे मीडिया पॅनलिस्ट व चंद्रपूर शहर आणि जिल्ह्याचे प्रभारी म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे.

Web Title: Vishal Muttemwar in charge of social media of Pradesh Congress