शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
2
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
3
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
4
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
5
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
6
२४ वर्षे जुन्या खटल्यात मेधा पाटकर दोषी
7
विधान परिषदेच्या चार जागांसाठी २६ जूनला मतदान
8
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
9
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
10
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
11
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
12
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल
13
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
14
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
15
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
16
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
17
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
18
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
19
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
20
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर

नागपुरात व्हायरस म्युटेशनमुळे वाढला व्हायरल तापाचा अवधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2020 12:45 AM

काही वर्षांपूर्वी ‘व्हायरल फीवर’वर (विषाणूजन्य ताप) औषध घेतल्यास तीन दिवसात रुग्ण बरा व्हायचा. परंतु आता पाच ते सात दिवसाच्या उपचारानंतरही ‘व्हायरल फीवर’ बरा होत नाही. लोकांमध्ये याला घेऊन भीतीचे वातावरण आहे.

ठळक मुद्देनागरिकांमध्ये भीतीचे वातावरण : चिंता न करण्याचा डॉक्टरांचा सल्ला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : काही वर्षांपूर्वी ‘व्हायरल फीवर’वर (विषाणूजन्य ताप) औषध घेतल्यास तीन दिवसात रुग्ण बरा व्हायचा. परंतु आता पाच ते सात दिवसाच्या उपचारानंतरही ‘व्हायरल फीवर’ बरा होत नाही. लोकांमध्ये याला घेऊन भीतीचे वातावरण आहे. डॉक्टरांनीही याला दुजोरा दिला आहे. परंतु असे का होते, यावर विविध तर्क लावले जात आहे. काही डॉक्टरांनी याला, व्हायरसचे बदलते स्वरूप (म्युटेशन) तर कुणी ‘क्रॉस इन्फेक्शन’ला जबाबदार ठरविले आहे. परंतु या सर्वामागे कुमकवत रोगप्रतिकारशक्ती असल्यावर एकमत आहे.विशेष म्हणजे, मध्यभारतात व्हायरसच्या बदलत्या स्वरूपावर चिंता करण्याची गरज नाही. उपचाराची पद्धत व औषधांची मात्रा बदलविल्यास धोका टाळता येतो.शहरातील डॉक्टरांनुसार, गेल्या पंधरवड्यात व्हायरल फिवर, सर्दी-खोकला, डेंग्यू संशयित रुग्णांची संख्या दुपटीने वाढली आहे. मेयो, मेडिकलमध्येही या आजाराच्या रुग्णांचे प्रमाण मोठे आहे. खासगी इस्पितळातही हेच चित्र आहे. लहान मुले व वृद्धांमध्ये रोगप्रतिकार शक्ती कमी असल्याने व्हायरल फिवर होण्याचा धोका राहत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. व्हायरल फिवरच्या बदलत्या स्वरुपावर काही डॉक्टरांनी औषधांची मात्रा वाढविली आहे. त्याच धर्तीवर काही डॉक्टर आजाराच्या लक्षणावर उपचार करीत आहे. व्हायरलवर प्रतिबंधक लस किंवा औषधे नाहीत. परंतु वारंवार व योग्य पद्धतीने साबणाने हात धुतल्यास, शरीराची स्वच्छता ठेवल्यास, योग्य आहार घेतल्यास या रोगाला काही प्रमाणात दूर ठेवता येते.डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच औषधे घ्यावीकोणत्याही व्यक्तीला व्हायरल फिवर, खूप ताप, सर्दी, खोकला असेल तर त्याने स्वत:हून औषध घेऊ नये. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच, औषध घ्यायला हवे, असे सर्वच डॉक्टरांचे सांगणे आहे. आजाराची लक्षणे पाहूनच डॉक्टर औषध देतात. स्वत:हून औषधी घेतल्यास मूत्रपिंड, यकृतावर याचा प्रभाव पडण्याची शक्यता असते.व्हायरसचा जेनेटिक प्रोफाईल बदलत आहेप्रसिद्ध वरिष्ठ फिजिशियन डॉ. जय देशमुख म्हणाले, व्हायरसचा ‘जेनेटिक प्रोफाईल’ किंवा ‘डीएनए’मध्ये वेळेनुसार बदल होतो. यामुळे रुग्णांवरही याचा वेगवेगळा प्रभाव पडतो. व्हायरसच्या म्युटेशनमुळे आजाराचे दिवस वाढतात. आपल्या देशात लोकसंख्या मोठी आहे. यामुळेही व्हायरलचा प्रकोप गतीने वाढतो. परंतु व्हायरलच्या लक्षणावर प्रभावी औषधे आहेत. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही.रोगप्रतिकार शक्ती वाढवायला हवीवरिष्ठ फिजिशियन डॉ.निखिल बालंखे म्हणाले, व्हायरसच्या म्युटेशनमुळे पाच ते आठ दिवसांपर्यंत व्हायरल फीव्हर असतो. यात उपचाराची पद्धत तीच असते, परंतु औषधांचा डोज वाढून दिला जातो. व्हायरल दूर ठेवण्यासाठी रोगप्रतिकार शक्ती वाढविण्याची गरज असते.क्रॉस इन्फेक्शनमुळेही वाढतो वेळव्हायरल फीव्हरचे दिवस वाढले आहे. यासाठी ‘क्रॉस इन्फेक्शन’ हे मुख्य कारण असल्याचे बालरोग तज्ज्ञ डॉ. वसंत खळतकर यांचे म्हणणे आहे. परंतु त्यांनी ‘व्हायरस म्युटेशन’च्या शक्यतेला नाकारले आहे. त्यांच्यानुसार ‘म्युटेशन’ला खूप वर्षे लागतात. जर लहान मुलांमध्ये एकदा व्हायरल फीव्हर झाला तर तो दोन-तीन दिवसांपर्यंत राहतो. परंतु दोन किंवा तीन दिवसांत जर पुन्हा खूप जास्त ताप आला असेल, तर पुन्हा व्हायरलचा संसर्ग झाल्याची शक्यता असते.

टॅग्स :Healthआरोग्यnagpurनागपूर