व्हीआयपी कल्चरला दिला फाटा; उपमुख्यमंत्र्यांनी रांगेत उभे राहून घेतला बोर्डिंग पास
By कमलेश वानखेडे | Updated: October 27, 2022 19:12 IST2022-10-27T19:12:14+5:302022-10-27T19:12:56+5:30
Nagpur News राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकाळी नागपूर विमानतळावर पोहचले असता त्यांनी व्हीआयपी असल्याचा फायदा घेत सरळ निघून न जाता सामान्य प्रवाशांप्रमाणे लाईनमध्ये लागून बोर्डींग पास घेणे पसंत केले.

व्हीआयपी कल्चरला दिला फाटा; उपमुख्यमंत्र्यांनी रांगेत उभे राहून घेतला बोर्डिंग पास
ठळक मुद्देव्हीआयपी कल्चरला बदलण्याचा प्रयत्न
नागपूर: साधारणत: नेते विविध कार्यक्रमांमध्ये व्यस्त राहत असल्याने ते सार्वजिनक ठिकाणी व्हीआयपी असल्याचा फायदा घेताना दिसतात. मात्र, याच व्हीआयपी कल्चरला बदलण्याचा प्रयत्न राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केले आहेत.
नुकतेच देवेंद्र फडणवीस हे नागपुरातील कार्यक्रम आटोपून विमानाने दिल्लीसाठी रवाना झाले. सकाळी नागपूर विमानतळावर पोहचले असता त्यांनी व्हीआयपी असल्याचा फायदा घेत सरळ निघून न जाता सामान्य प्रवाशांप्रमाणे लाईनमध्ये लागून बोर्डींग पास घेणे पसंत केले. फडणवीसांचा हा साधेपणा त्यावेळी विमानतळावर उपस्थित असलेले प्रवासी व विमानतळावर कार्यरत कर्मचाऱ्यांनाही भावला.