शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत आतापर्यंत ८.१ टक्के मतदान;पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान हातबॉम्ब फेकले; अनेक जखमी
2
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
3
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
4
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
5
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
6
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
7
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
8
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
9
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
10
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
11
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
12
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
13
महिला क्रिकेटरचा 'हनीट्रॅप' गेम! व्यावसायिकाला ६३ लाखांना लुटले, मुंबई पोलिसांनी श्रीनगरमधून उचलले
14
"रिद्धी खूप खूश झाली अन्..." राकेश बापटने सांगितली एक्स वाईफची कशी होती प्रतिक्रिया
15
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
16
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
17
‘पंतप्रधान मोदींना लक्ष्य करणे म्हणजे थेट १४० कोटी भारतीयांचा अपमान’, एकनाथ शिंदेंची खर्गेंवर टीका
18
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
19
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
20
बाल्कनीतून कबुतरांना हटवण्याचा सर्वात सोपा अन् प्रभावी उपाय; समस्येतून मिळेल कायमचा तोडगा
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरमध्ये ‘शेतकरी बंद’ला हिंसक वळण

By admin | Updated: June 5, 2017 14:59 IST

शेतकरी संपावर या आंदोलनादरम्यान सोमवारी नागपूर जिल्ह्यात सर्वत्र कडकडीत बंद पाळण्यात आला.

ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 5 -  शेतकरी संपावर या आंदोलनादरम्यान सोमवारी नागपूर जिल्ह्यात सर्वत्र कडकडीत बंद पाळण्यात आला. मात्र, रामटेक शहरात भाजपा व शिवसेना कायकर्त्यांमध्ये हॉटेल बंद करण्यावरून सकाळी 11 वाजताच्या सुमारास वाद निर्माण झाल्याने तसेच भाजपा कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या माजी नगरसेवक बिकेंद्र महाजन यांना जबर मारहाण केल्याने पोलिसांना नाईलाजास्तव लाठीमार करावा लागला. 
 
शिवसेनेने शेतकरी आंदोलन आणि बंदला आधीच समर्थन जाहीर केले होते. रामटेक शहरात सकाळीपासून संपूर्ण बाजारपेठ बंदच होती. मात्र भाजपाचे नगरसेवक आलोक मानकर यांनी त्यांचे हॉटेल सुरूच ठेवल्याने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना हॉटेल बंद करण्याची वारंवार विनंती केली. 
 
मानकर हॉटेल बंद करीत नसल्याचे लक्षात येताच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आत शिरून हॉटेलमधील साहित्य फेकायला सुरुवात केली. आलोक मानकर यांच्या सूचनेवरून भाजपाचे कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शिवसेना कार्यकर्त्यांना धक्काबुक्की करीत शिवसेनेचे माजी नगरसेवक बिकेंद्र महाजन यांना जबर मारहाण करायला सुरुवात केली. 
 
हा जमाव महात्मा गांधी चौकात पोहोचताच उपविभागीय पोलीस अधिकारी लोहीत मतानी तिथे दाखल झाले. त्यांनी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना शांत करीत बिकेंद्र महाजन यांना ताब्यात घेतले. परंतु, कुणीही ऐकायला तयार नसल्याने शेवटी पोलिसांनी लाठीमार केला.