खेडी व शहरांचा सुवर्णमध्य साधा

By Admin | Updated: December 14, 2015 03:10 IST2015-12-14T03:10:03+5:302015-12-14T03:10:03+5:30

भारतात होणारे शहरीकरण थांबवून खेडी स्वयंपूर्ण बनविणे तसेच खेडी व शहरांचा सुवर्णमध्य साधून आणि ग्रामीण तंत्रज्ञानाचा उपयोग करून ...

Village of the villages and towns should be in the middle | खेडी व शहरांचा सुवर्णमध्य साधा

खेडी व शहरांचा सुवर्णमध्य साधा

अनिल काकोडकर यांचे प्रतिपादन : ‘कृषी क्षेत्रात रेडिएशनचे महत्त्व’ विषयावर कार्यशाळा
नागपूर : भारतात होणारे शहरीकरण थांबवून खेडी स्वयंपूर्ण बनविणे तसेच खेडी व शहरांचा सुवर्णमध्य साधून आणि ग्रामीण तंत्रज्ञानाचा उपयोग करून कृषी क्षेत्रात आर्थिक क्रांती घडविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांनी येथे केले. ‘अ‍ॅग्रो व्हिजन’ या राष्ट्रीय कृषी प्रदर्शनात ‘कृषी क्षेत्रात रेडिएशनचे महत्त्व’ या विषयावर रविवारी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, अ‍ॅग्रो व्हिजन सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. सी.डी. मायी आणि वेदचे अध्यक्ष देवेंद्र पारेख उपस्थित होते.

रेडिएशन तंत्रज्ञानामुळे शेतकी मालाचे आयुष्य वाढते
रेडिएशन तंत्रज्ञानामुळे शेतकी मालाचे आयुष्य वाढते. बऱ्याचवेळी उत्पादनांच्या किमतीत जाणीवपूर्वक कमी केल्या जातात. पण या तंत्रज्ञानाने मालाला अनेक दिवसांपर्यंत साठवून ठेवता येते आणि मालाला जास्त किंमत मिळाल्यास ते विकता येते. रेडिएशन तंत्रज्ञानाचा उपयोग करून भारतातील आंबे सध्या अमेरिकेत मिळतात. मध्यस्थ टाळून उत्पादक ते ग्राहक अशी साखळी निर्माण होते. ‘बार्क’ने नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथे प्रात्यक्षिक प्रकल्प उभारला आहे. प्रकल्पात कांद्यावर रेडिएशन प्रक्रिया करण्यात येते. या प्रकियेत विषाणू आणि अन्य घातक घटकांचा नाश होतो. अशा प्रकारचे १७ रेडिएशन प्रक्रिया प्रकल्प सुरू आहेत. डॉ. गोखने पाटील यांच्या चॉलतर्फे खाद्यान्नांवर अशीच प्रक्रिया करण्यात येते. ही प्रक्रिया गुणवत्तापूर्ण नियमानुसार केली जाते. हे पुढील तंत्रज्ञान असल्याचे काकोडकर यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांना बँकांच्या मदतीने कोल्ड स्टोरेज उभारण्याची गरज आहे. त्यामुळे त्यांच्या शेतकी मालाला चांगला भाव मिळू शकतो.

‘बार्क’ची भूमिका महत्त्वपूर्ण
काकोडकर म्हणाले, खेड्यांमधील जीवन सुधारण्यात भाभा आण्विक संशोधन केंद्राची (बार्क) महत्त्वाची भूमिका बजावित आहे. त्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येत आहे. एकीकडे कृषी तंत्रज्ञानाचा विकास तर दुसरीकडे गावांमध्ये तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात येत आहे. ‘बार्क’शी संबंधित आकृती संस्थेतर्फे शेतकऱ्यांना मृदु तपासणीची कीट देण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी आपल्या शेतीवर मृदु तपासणी करून त्यातील एनपीके घटक शोधावे, असा यामागील उद्देश आहे. कार्बनमय घटकांचे विश्लेषण तसेच खतांचे व्यवस्थापन याद्वारे होणार आहे. तसेच आकृतीतर्फे शुद्ध पाण्याचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना देत आहे. पंढरपूर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाने कीटचे डिझाईन केले आहे. शेतकऱ्यांनी जास्त किमतीच्या टिश्यू कल्चर लॅबचा उपयोग करण्याऐवजी फार्म स्तरावर टिश्यू कल्चर प्रणालीचा उपयोग करण्याचा सल्ला काकोडकर यांनी दिला. ‘बार्क’ने शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी लहान लॅब तयार केली आहे. वातावरण निर्मितीसाठी आकृतीने महाराष्ट्रातील २० गावांना भेटी दिल्या आहेत. ग्रामीणांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी खेड्यांमध्ये मानव संशोधन आणि संशोधन सुविधा तयार करण्याचे आवाहन त्यांनी केले. ‘बार्क’ने खेड्यांमध्ये कृषीशी संबंधित उपक्रम राबविण्यासाठी महानेत्र नावाने कार्यक्रम सुरू केला असून गेल्या दोन वर्षांत नऊ हजार गावांना फायदा झाल्याचे डॉ. काकोडकर म्हणाले.

Web Title: Village of the villages and towns should be in the middle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.