Video : धक्कादायक ! युवासेना तालुका प्रमुखाकडून ट्रक चालकाला वरती टांगून मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2019 01:08 AM2019-07-29T01:08:57+5:302019-07-29T01:12:29+5:30

मारहाणीचा व्हिडीओ आरोपीपैकी कुणीतरी व्हायरल केल्याने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाला गांभीर्याने  घेत वाडी पोलिसांना सूचना देत चौकशी करण्याचे आदेश दिली.

Video: Shocking! Youth Force Taluka chief beats up truck driver | Video : धक्कादायक ! युवासेना तालुका प्रमुखाकडून ट्रक चालकाला वरती टांगून मारहाण

Video : धक्कादायक ! युवासेना तालुका प्रमुखाकडून ट्रक चालकाला वरती टांगून मारहाण

Next

 नागपूर : गोदामातून माल घेवून तो संबंधीत स्थळी न पोहोचविता या कामासाठी दिलेला अ‍ॅडव्हास परस्पर खर्च करणाºया चालकाला ट्रक मालकाकडून अमानुष मारहाण करण्यात आली. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने पोलिसांनी दखल घेत आरोपी युवा सेनेचा तालुका प्रमुख अखिल पोहनकर व त्याचा साथीदार अमित ठाकरे (रा.दत्तवाडी) याला अटक केली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार युवासेना तालूका प्रमुख अखिल भावराव पोहनकर (३०) रा. दत्तवाडी यांच्या ट्रकवर विक्की सुनील आगलावे हा चालक म्हणून अनेक दिवसांपासून काम करतो. एक आठवड्यापूर्वी वाडी येथील गोदमातून त्रिवेंद्रम येथील माल ट्रकमध्ये भरला होता. तसेच अडव्हान्स म्हणून ३०  हजार व डिझेल भरण्यासाठी ३ हजार चालकाला दिले होते. चालक विक्की याने ट्रक गोदाममधून काढून त्रिवेंद्रम येथे न नेता  अन्य ठिकाणी नेऊन ठेवला. यासोबतच ट्रक मालकाने अ‍ॅडव्हान्स म्हणून दिलेली रक्कम परस्पर खर्च केली. पोहनकर यांना याबाबत कळले ते चालकाचा शोध घेत होता. शनिवारी तो त्यांना गवसला. पोहनकर यांनी आपल्या अन्य साथीदारासह विक्की याला वडधामना येथील ट्रान्सपोर्ट कार्यालयात नेले. तिथे त्याला अमानुषरित्या मारहाण करीत चित्रीकरण करण्यात आले. 
मारहाणीचा व्हिडीओ आरोपीपैकी कुणीतरी व्हायरल केल्याने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाला गांभीर्याने  घेत वाडी पोलिसांना सूचना देत चौकशी करण्याचे आदेश दिली. याप्रकरणी वाडी पोलिसांनी आरोपी अखिल व त्याचा साथीदार अमित ठाकरे यास अटक करून भांदविच्या कलम ३०७ कलमान्वये गुन्हा दाखल केला. या प्रकरणातील इतर फरार आरोपीचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाठक यांच्या नेतृत्वातील पथक शोध घेत आहे.

Web Title: Video: Shocking! Youth Force Taluka chief beats up truck driver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.