शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात शिक्षणशास्त्राचा समान अभ्यासक्रम

By admin | Updated: August 14, 2016 02:58 IST

विदर्भातील विद्यापीठांमध्ये शिक्षणशास्त्र अभ्यासक्रमाच्या अध्यापन तसेच प्रात्यक्षिक कार्यक्रमांत एकसूत्रता यावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

तिन्ही विद्यापीठांचे प्रयत्न सुरू : विशेष कार्यशाळेचे आयोजन नागपूर : विदर्भातील विद्यापीठांमध्ये शिक्षणशास्त्र अभ्यासक्रमाच्या अध्यापन तसेच प्रात्यक्षिक कार्यक्रमांत एकसूत्रता यावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याअंतर्गतच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर शिक्षणशास्त्र विभागातर्फे आयोजित विशेष कार्यशाळेदरम्यान तीन विद्यापीठांचे कुलगुरू एका मंचावर एकत्र आले होते. या अभ्यासक्रमांत ‘चॉईस बेस्ड क्रेडिट’ प्रणाली लावण्यात येत आहे. या प्रणालीला विरोध न करता शिक्षकांनी याकडे सकारात्मक नजरेने पहावे, असा यावेळी मान्यवरांचा सूर होता. विभागाच्या मदर टेरेसा सभागृहात आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांच्या हस्ते झाले. यावेळी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.एन.व्ही.कल्याणकर, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.मुरलीधर चांदेकर व ‘इंडियन मेरिटाईम युनिव्हर्सिटी’चे प्र-कुलगुरू डॉ.गौरीशंकर पाराशर, अशोक जीवतोडे प्रामुख्याने उपस्थित होते. ‘चॉईस बेस्ट क्रेडिट’ प्रणाली लागू करण्यात आली आहे. परंतु ही प्रणाली लागू करण्याअगोदर आपल्या देशातील सामाजिक परिस्थिती, शैक्षणिक वातावरण यांची चाचपणी करणे आवश्यक होते. ही प्रणाली विदेशातील विद्यापीठांना सोयीची आहे. परंतु आता विद्यापीठ अनुदान आयोगाचेच निर्देश असल्यामुळे याचा सकारात्मक पद्धतीने स्वीकार करायला हवा, असे मत डॉ.काणे यांनी व्यक्त केले. आपल्या शिक्षणप्रणालीत परीक्षेवर जास्तीत जास्त भर देण्यात येतो. यामुळे शिक्षणाच्या मूळ उद्दिष्टाला छेद गेला आहे. ‘चॉईस बेस्ड क्रेडिट’ प्रणाली ही काळाची गरज आहे. हा बदल स्वीकारण्यासाठी शिक्षकांनी तयार असले पाहिजे, असे आवाहन डॉ.कल्याणकर यांनी केले. कुठलीही नवीन गोष्ट लागू करायची असेल तर शिक्षणक्षेत्रात त्यातील नकारात्मक मुद्दे शोधल्या जातात. शिक्षकांनी संकुचित विचारसरणी सोडून याबाबत सकारात्मक दृष्टिकोन ठेवायची गरज आहे. विदर्भातील सर्व विद्यापीठांमध्ये एकसूत्रता आणण्यासाठी शिक्षकांचा पुढाकार अपेक्षित आहे, असे प्रतिपादन डॉ.चांदेकर यांनी केले. विभागप्रमुख डॉ.राजश्री वैष्णव यांनी प्रास्ताविक केले. यावेळी अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती झाल्याबद्दल डॉ.चांदेकर यांचा सत्कारदेखील करण्यात आला. या कार्यशाळेला विदर्भातील विविध शिक्षण महाविद्यालायांतून २०० हून अधिक प्राध्यापक उपस्थित होते. समारोपीय सत्रात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी उपस्थित प्राध्यापकांना मार्गदर्शन केले.(प्रतिनिधी)