शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

विदर्भवाद्यांचा संकल्प : विदर्भ राज्य यंदा मिळवणारच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 10:47 PM

विदर्भ निर्माण यात्रेतून निवडणूक जिंकण्याची स्फूर्ती मिळाली आहे. आता विदर्भवाद्यांनीच विदर्भ मिळविण्याचा निर्धार केला आहे. स्वतंत्र विदर्भ राज्य यंदा मिळवणारच, असा संकल्प विदर्भवादी नेत्यांनी शनिवारी नागपुरात केला.

ठळक मुद्देविदर्भ निर्माण यात्रेचा समारोप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भ निर्माण यात्रेतून निवडणूक जिंकण्याची स्फूर्ती मिळाली आहे. आता विदर्भवाद्यांनीच विदर्भ मिळविण्याचा निर्धार केला आहे. स्वतंत्र विदर्भ राज्य यंदा मिळवणारच, असा संकल्प विदर्भवादी नेत्यांनी शनिवारी नागपुरात केला.विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे २ जानेवारीपासून संपूर्ण विदर्भातून विदर्भ निर्माण यात्रा काढण्यात आली. या यात्रेचा शनिवारी सीताबर्डीतील माहेश्वरी सभागृहात समारंभपूर्वक समारोप झाला. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. याप्रसंगी आम आदमी पक्षाचे देवेंद्र वानखेडे, बीआरएसपीचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. सुरेश माने, विदर्भ माझा पक्षाचे संस्थापक अध्यक्ष राजकुमार तिरपुडे यांच्यासह विदर्भवादी नेते मोरेश्वर टेंभूर्णे, डॉ. श्रीनिवास खांदेवाले, अ‍ॅड. नीरज खांदेवाले, प्रबीरकुमार चक्रवर्ती, माजी आमदार यादवराव देवगडे, राम नेवले, अरुण केदार, श्रीकांत तरार, विजया धोटे, राजू नागुलवार, रंजना मामर्डे, मुकेश मासूरकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी अ‍ॅड. सुरेश माने म्हणाले की, निवडणुकांदरम्यान विदर्भद्रोही प्रचारही करू शकणार नाहीत, एवढी चेतना जनतेत निर्माण करू. १९८० मध्ये संपलेला विदर्भ आंदोलनाचा जलवा यंदाच्या निवडणुकीत दिसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राजकुमार तिरपुडे म्हणाले, ९५ टक्के लोकांना वेगळा विदर्भ हवा असला तरी राजकीय पर्याय जनतेपुढे नव्हता. विदर्भ निर्माण महामंचाकडून हा पर्याय उपलब्ध करून दिला जात आहे. पदासाठी नाही तर विदर्भाचा नारा बुलंद करण्यासाठी निवडणुका लढवीत आहोत. इतरांचीही यावेळी भाषणे झाली.प्रास्ताविक राम नेवले यांनी केले. संचालन राजू नागुलवार यांनी केले.लोकमत चौकात भव्य स्वागत 

दरम्यान, ११ दिवस विदर्भाचा दौरा करून बुटीबोरीमार्गे ही विदर्भ निर्माण यात्रा नागपुरात पोहोचली. अमरावती व नागपूर या दोन्ही ठिकाणांहून निघालेल्या दोन यात्रा एकत्रच नागपुरात दाखल झाल्या. यावेळी लोकमत चौकात विदर्भवाद्यांनी या यात्रेचे उत्स्फूर्तपणे ढोलताशा व फटाके फोडून स्वागत केले. यानंतर रॅलीद्वारे सभेच्या ठिकाणी नेते पोहोचले.तुम्ही मत द्या, आम्ही विदर्भ देऊ‘तुम्ही केवळ मत द्या, आम्ही विदर्भ देऊ’, अशी घोषणा ज्येष्ठ विदर्भवादी नेते माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केली. विदर्भाचे आंदोलन टोकाला नेण्यासाठीच निवडणुका लढणार असून, ही खरी परीक्षा आहे. विदर्भ मिळवू औंदा या संकल्पनेनेच येणाऱ्या निवडणुका जिंकणार आहोत. २-३ फेब्रुवारीला दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल विदर्भात येत आहेत. त्यानंतर ९ फेब्रुवारीला चिटणीस पार्कवर भव्य रॅली होणार आहे. या दोन्ही कार्यक्रमांच्या निमित्ताने विदर्भाची ताकद दाखविण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :Vidarbhaविदर्भagitationआंदोलन