शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

Vidarbha Rains : पुढचे सहा दिवस विदर्भातील 'या' जिल्ह्यांना पावसाचा जोरदार फटका ! दसऱ्यापर्यंत पावसाचा रोख कसा बदलणार?

By निशांत वानखेडे | Updated: September 26, 2025 20:41 IST

विदर्भात मध्यम, महाराष्ट्रात जोरदार शक्यता : शुक्रवारी दिवसभर ताप, सायंकाळी आल्या सरी

नागपूर : चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या लाेकांना हैराण करणारा पाऊस आणखी म्हणजे दसऱ्यापर्यंत पिच्छा साेडणार नाही, अशी  स्थिती आहे. पुढचे सहा दिवस विदर्भात मध्यम, तर उर्वरित महाराष्ट्रात जाेरदार ते अतिजाेरदार पाऊस हाेईल, अशी शक्यता  हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे नद्यांच्या परिसरात पुन्हा पूर परिस्थिती निर्माण हाेईल, अशी भीती आहे. विदर्भात चंद्रपूर, गडचिराेलीत जाेरदार पावसाची शक्यता आहे. 

मध्य व वायव्य बंगाल उपसागरादरम्यान हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून २७ राेजी सकाळपर्यन्त हवेच्या तीव्र कमी दाबात रूपांतरीत हाेण्याची शक्यता आहे. ही स्थिती चंद्रपूर, हिंगोली, पैठण, अहिल्यानगर मार्गे मुंबईकडे मार्गक्रमनाच्या शक्यतेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात शनिवारपासुन दसऱ्यापर्यंतच्या ६ दिवसात जोरदार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. विदर्भाच्या नागपूर, चंद्रपूर, गडचिराेली, गाेंदिया, भंडारा व पश्चिम विदर्भात अमरावती, यवतमाळ, वाशिम जिल्ह्यात मध्यम ते जाेरदार  पाऊस हाेईल, असा अंदाज आहे. त्यानंतर पुढचे पाच दिवस २ ऑक्टाेबरपर्यंत विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस  हाेत राहिल, अशीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. ३ ऑक्टाेबरनंतरच बऱ्यापैकी उघडीप मिळण्याचा अंदाज आहे. 

शुक्रवारी दिवसभर ताप, सायंकाळी गारवा

दरम्यान गुरुवारी सायंकाळ पासून नागपूर जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरुपात १२.५ मि.मी. पाऊस झाला. शुक्रवारी मात्र  उन्हाची तीव्रता वाढली हाेती. त्यामुळे कमाल तापमान २.९ अंशाने वाढून पुन्हा ३४.२ अंशावर गेले. त्यामुळे दिवसभर  उकाड्याचा त्रास झाला. सायंकाळी मात्र हलक्या सरी बरसल्या. ५ मि.मी. पावसाची नाेंद झाली. दुसरीकडे विदर्भात चंद्रपूरला रात्री मुसळधार (५९ मि.मी.), तर गडचिराेली (२९.२ मि.मी.), गाेंदिया (३४.५ मि.मी.), भंडारा (२२ मि.मी.) जिल्ह्यात  चांगला पाऊस झाला. या चारही जिल्ह्यात शुक्रवारी मात्र तुरळक सरी बरसल्या. मात्र तापमान बरेच वाढले हाेते. चंद्रपूर ६ अंशाने वाढून ३४.८ अंशावर पाेहचले. वर्धा ४.८ अंशाने वाढून ३३.८ अंशावर गेले. गाेंदिया, भंडारा, गडचिराेलीतही २ पेक्षा अधिक अंशाची वाढ झाली.

English
हिंदी सारांश
Web Title : Vidarbha Braces for Heavy Rains: Six-Day Alert Issued

Web Summary : Vidarbha faces heavy rainfall for six days, potentially causing floods in Chandrapur and Gadchiroli. A low-pressure area in the Bay of Bengal is expected to intensify, bringing widespread rain across Maharashtra until Dussehra, with some relief expected after October 3rd.
टॅग्स :Vidarbhaविदर्भmonsoonमोसमी पाऊसnagpurनागपूरRainपाऊसweatherहवामान अंदाज