शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
3
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
5
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
6
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
7
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
8
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
9
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
10
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
11
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
12
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
13
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
15
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
16
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
17
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
18
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
19
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
20
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?

विदर्भात १,७९,४७७ हेक्टर भौतिक सिंचन अनुशेष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 8:51 PM

विदर्भ विकास मंडळाच्या बोलण्यावर विश्वास ठेवला तर विदर्भातील भौतिक अनुशेष जवळपास संपला आहे. केवळ अमरावती विभागातील अमरावती, अकोला, वाशिम व बुलडाणा या चार जिल्ह्यात १ लाख ७९ हजार ४७७ हेक्टर भौतिक सिंचन अनुशेष शिल्लक आहे. गोसीखुर्दमुळे नागपूर विभागाचा अनुशेष संपला आहे. जून २०२२ पर्यंत अमरावती विभागातील सिंचनाचा अनुशेषही दूर केला जाईल. यासाठी राज्य सरकारने २०१९-२० साठी अर्थसंकल्पात ७६२ कोटी रुपयाची तरतूद केली असल्याचेही मंडळाने सांगितले. विदर्भ विकास मंडळाचे अध्यक्ष आ. चैनसुख संचेती यांनी गुरुवारी मंडळाच्या कार्यालयात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

ठळक मुद्देअमरावती विभागातील जिल्हे प्रभावित, नागपूरचा अनुशेष संपला२०२२ पर्यंत निर्मूलनाचे लक्ष्य, ७६२ कोटीची तरतूद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भ विकास मंडळाच्या बोलण्यावर विश्वास ठेवला तर विदर्भातील भौतिक अनुशेष जवळपास संपला आहे. केवळ अमरावती विभागातील अमरावती, अकोला, वाशिम व बुलडाणा या चार जिल्ह्यात १ लाख ७९ हजार ४७७ हेक्टर भौतिक सिंचन अनुशेष शिल्लक आहे. गोसीखुर्दमुळे नागपूर विभागाचा अनुशेष संपला आहे. जून २०२२ पर्यंत अमरावती विभागातील सिंचनाचा अनुशेषही दूर केला जाईल. यासाठी राज्य सरकारने २०१९-२० साठी अर्थसंकल्पात ७६२ कोटी रुपयाची तरतूद केली असल्याचेही मंडळाने सांगितले.विदर्भ विकास मंडळाचे अध्यक्ष आ. चैनसुख संचेती यांनी गुरुवारी मंडळाच्या कार्यालयात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. अध्यक्ष आ. संचेती यांनी स्पष्टपणे सांगितले की, १९९४ मध्ये बॅकलॉग अ‍ॅण्ड इंडिकेटर्स कमेटीतर्फे विदर्भातील सिंचनाचा जो अनुशेष उघडकीस आणण्यात आला होता, तो दूर करण्यात आलेला आहे. आता केवळ भौतिक अनुशेष शिल्लक आहे. तो सुद्धा केवळ अमरावती विभागातील चार जिल्ह्यामधील आहे. अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक ७२,९७१ हेक्टरचा अनुशेष आहे. त्याचप्रकारे अकोलामध्ये ४५,०२८ हेक्टर, वाशिममध्ये ९,२१६ हेक्टर आणि बुलडाणा येथे ५२,२६२ हेक्टर सिंचनाचा अनुशेष शिल्लक आहे. अनुशेष निर्मूलन व सिंचन सुविधा वाढविण्यासाठी ७६२ कोटी रुपयाची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आलेली आहे. वाशिम जिल्ह्यातील बॅकलॉग जून २०२१ पर्यंत व इतर तीन जिल्ह्यातील बॅकलॉग जून २०२२ पर्यंत दूर करण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. गोसीखुर्द प्रकल्प व नितीन गडकरी हे केंद्रीय जल संसाधन मंत्री असताना त्यांच्या कार्यकाळात झालेल्या ३४०० कोटी रुपयाच्या कामामुळे नागपूर विभागचा अनुशेष आता शिल्लक राहिलेला नाही. १९९४ नंतर तयार झालेल्या नवीन अनुशेषाबाबत आ. संचेती यांनी सांगितले की, बॅकलॉग अ‍ॅण्ड इंडिकेटर्स कमिटीच्या आकड्यांवरच काम सुरू आहे. यात कुठलेही संशोधन झालेले नाही.नाराजी नाही, राहणारही नाहीआ. चैनसुख संचेती यांनी विदर्भ विकास मंडळाचे अध्यक्षपद नियुक्तीच्या तब्बल वर्षभरानंतर स्वीकारले. राजकीय वर्तुळात अशी चर्चा होती की, त्यांनी कॅबिनेट मंत्रिपद मिळेल, या अपेक्षेने अध्यक्षपद स्वीकारले नव्हते. याबाबत आ. संचेती यांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, ‘मी सर्वात ज्येष्ठ आमदार असल्यामुळे मला अध्यक्षपद देण्यात आले आहे. यात कुठलीही नाराजी नाही. मी तेव्हाही नाराज नव्हतो आणि आताही नाही आणि कधी राहणारही नाही. मंडळाच्या माध्यमातून विदर्भाला विकासाच्या मार्गावर घेऊन जाऊ. काही जबाबदाऱ्या असल्यामुळे पद स्वीकारता आले नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.शेतकऱ्यांच्या आत्महत्येत कमतरतामंडळाचे अध्यक्ष आ. संचेती यांना शेतकरी आत्महत्येबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, शेतकरी आत्महत्येची प्रकरणे कमी होत आहेत. परंतु शेतकरी आत्महत्या हा कुठल्याही सरकारसाठी चिंतेचा विषय आहे. ही संख्या आणखी कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आत्महत्येचे आकडे आणि सरकारी दाव्यांमध्ये अंतर असल्याच्या प्रश्नावर त्यांनी मौन धारण केले.नाराजी नाही, राहणारही नाहीआ. चैनसुख संचेती यांनी विदर्भ विकास मंडळाचे अध्यक्षपद नियुक्तीच्या तब्बल वर्षभरानंतर स्वीकारले. राजकीय वर्तुळात अशी चर्चा होती की, त्यांनी कॅबिनेट मंत्रिपद मिळेल, या अपेक्षेने अध्यक्षपद स्वीकारले नव्हते. याबाबत आ. संचेती यांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, ‘मी सर्वात ज्येष्ठ आमदार असल्यामुळे मला अध्यक्षपद देण्यात आले आहे. यात कुठलीही नाराजी नाही. मी तेव्हाही नाराज नव्हतो आणि आताही नाही आणि कधी राहणारही नाही. मंडळाच्या माध्यमातून विदर्भाला विकासाच्या मार्गावर घेऊन जाऊ. काही जबाबदाऱ्या असल्यामुळे पद स्वीकारता आले नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.शेतकऱ्यांच्या आत्महत्येत कमतरतामंडळाचे अध्यक्ष आ. संचेती यांना शेतकरी आत्महत्येबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, शेतकरी आत्महत्येची प्रकरणे कमी होत आहेत. परंतु शेतकरी आत्महत्या हा कुठल्याही सरकारसाठी चिंतेचा विषय आहे. ही संख्या आणखी कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आत्महत्येचे आकडे आणि सरकारी दाव्यांमध्ये अंतर असल्याच्या प्रश्नावर त्यांनी मौन धारण केले.

टॅग्स :Vidarbha Development Boardविदर्भ वैधानिक विकास मंडळChainsukh Sanchetiचैनसुख संचेती