कुलगुरू काणेंना मिळणार मानद कर्नल कमांडन्ट उपाधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 00:59 IST2018-08-02T00:58:12+5:302018-08-02T00:59:24+5:30

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांना कर्नल कमांडन्टची मानद उपाधी प्रदान करण्यात येणार आहे. ‘एनसीसी’चे ‘अ‍ॅडिशनल डायरेक्टर जनरल’ तसेच ‘एनसीसी’चे नागपूर येथील ‘ग्रुप हेडक्वॉर्टर’ यांच्यातर्फे हा उपाधी प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

Vice Chancellor Kane will get honorary Colonel Commandant | कुलगुरू काणेंना मिळणार मानद कर्नल कमांडन्ट उपाधी

कुलगुरू काणेंना मिळणार मानद कर्नल कमांडन्ट उपाधी

ठळक मुद्देही उपाधी प्राप्त करणारे नागपूर विद्यापीठाचे तिसरे कुलगुरू

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांना कर्नल कमांडन्टची मानद उपाधी प्रदान करण्यात येणार आहे. ‘एनसीसी’चे ‘अ‍ॅडिशनल डायरेक्टर जनरल’ तसेच ‘एनसीसी’चे नागपूर येथील ‘ग्रुप हेडक्वॉर्टर’ यांच्यातर्फे हा उपाधी प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. ही उपाधी प्राप्त करणारे ते नागपूर विद्यापीठाचे तिसरे कुलगुरू ठरतील. याअगोदर डॉ.श.नु.पठाण व डॉ.अरुण सातपुतळे यांनाही या उपाधीने गौरविण्यात आले होते. ३ आॅगस्ट रोजी दुपारी १२ वाजता विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात हा कार्यक्रम होईल. महाराष्ट्र ‘एनसीसी’चे ‘अ‍ॅडिशनल डायरेक्टर जनरल’ मेजर जनरल गजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते ही उपाधी कुलगुरूंना प्रदान करण्यात येईल.

 

Web Title: Vice Chancellor Kane will get honorary Colonel Commandant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.