राजधानी एक्स्प्रेसमध्ये दारू पुरविणाऱ्या पेन्ट्रीकार व्हेंडरला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 23:26 IST2019-01-05T23:25:23+5:302019-01-05T23:26:17+5:30
प्रवाशाला दारू पुरविण्यासाठी दारू आणणाऱ्या राजधानी एक्स्प्रेसच्या पेन्ट्रीकार व्हेंडरला अटक केल्यानंतर शनिवारी तेलंगणा एक्स्प्रेसच्या पेन्ट्रीकार व्हेंडरला रेल्वे सुरक्षा दलाने अटक केली. त्याच्याजवळ दोन दारूच्या बॉटल्स आढळल्या. प्रवाशाकडून अधिक पैसे घेऊन दारू पुरविण्यासाठी दारू विकत आणल्याची कबुली त्याने दिली.

राजधानी एक्स्प्रेसमध्ये दारू पुरविणाऱ्या पेन्ट्रीकार व्हेंडरला अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रवाशाला दारू पुरविण्यासाठी दारू आणणाऱ्या राजधानी एक्स्प्रेसच्या पेन्ट्रीकार व्हेंडरला अटक केल्यानंतर शनिवारी तेलंगणा एक्स्प्रेसच्या पेन्ट्रीकार व्हेंडरला रेल्वे सुरक्षा दलाने अटक केली. त्याच्याजवळ दोन दारूच्या बॉटल्स आढळल्या. प्रवाशाकडून अधिक पैसे घेऊन दारू पुरविण्यासाठी दारू विकत आणल्याची कबुली त्याने दिली.
रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योतीकुमार सतीजा यांच्या मार्गदर्शनाखाली उषा तिग्गा, विकास शर्मा, सुषमा ढोमणे यांनी ही कारवाई केली. शनिवारी दुपारी ३.३० वाजता १२७२३ हैदराबाद-निजामुद्दीन तेलंगणा एक्स्प्रेस नागपूर रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक १ वर आली. आरपीएफच्या जवानांना व्हेंडरचे कपडे घातलेला एक व्यक्ती मेन गेटकडून येऊन पेन्ट्रीकारमध्ये चढताना दिसला. त्याला थांबवून विचारपूस केली असता त्याने आपले नाव रविकांत मोहन सिंह (३१) रा. उमरेला, भिंड असे सांगितले. दारूच्या दोन बॉटल्स खरेदी करण्यासाठी रेल्वे स्थानकाच्या बाहेर गेल्याची कबुली त्याने दिली. त्यानंतर त्याच्याविरुद्ध रेल्वे अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.