अट्टल वाहन चोराला गुन्हे शाखेच्या युनिट २ ने केली अटक 

By दयानंद पाईकराव | Updated: May 5, 2023 15:25 IST2023-05-05T15:25:35+5:302023-05-05T15:25:51+5:30

सुलतान खान मौसम खान (वय २८, रा. अब्दुल हमीदनगर, गोरेवाडा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

Vehicle thief arrested by Unit 2 of Crime Branch In Nagpur | अट्टल वाहन चोराला गुन्हे शाखेच्या युनिट २ ने केली अटक 

अट्टल वाहन चोराला गुन्हे शाखेच्या युनिट २ ने केली अटक 

नागपूर : महिलेचे बँकेच्या पार्र्किंगमध्ये उभी केलेली दुचाकी चोरून नेणाऱ्या आरोपीस गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने ताब्यात घेऊन एक लाख रुपयांची दुचाकी जप्त केली आहे. 

सुलतान खान मौसम खान (वय २८, रा. अब्दुल हमीदनगर, गोरेवाडा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. १५ एप्रिल २०२३ रोजी दुपारी ४.३० ते सायंकाळी ६.३० दरम्यान अश्विनी सुरेश धकाते (वय ३१, रा. उज्वल अपार्टमेंट, रहाटे कॉलनी धंतोली) यांनी आपली सुझुकी अ‍ॅक्सेस १२५ गाडी क्रमांक एम. एच. ४९, बी. वाय-६५४७ ही सदर पोलिस ठाण्याच्या हद्दीत बेरामजी टाऊन गोंडवाना चौक येथील कोटक महिंद्रा बँकेच्या पार्र्किंगमध्ये लॉक करून ठेवली होती.

दरम्यान अज्ञात आरोपीने त्यांची गाडी चोरुन नेल्या प्रकरणी सदर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना गुन्हे शाखेच्या युनिट २ चे अधिकारी, अंमलदारांनी मिळालेल्या गोपनिय माहितीनुसार आरोपी सुलतानला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरी केलेले एक लाख रुपये किमतीचे वाहन जप्त करण्यात आले. आरोपीने अंबाझरी ठाण्याच्या हद्दीतूनही एक अ‍ॅक्टीव्हा गाडी चोरी केल्याची कबुली दिली आहे. ही कारवाई गुन्हे शाखेचे उपायुक्त मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली संतोषसिंह ठाकुर, रामनरेश, बलराम झाडोकार, पराग ढोके, शेखर राघोर्ते, मिथुन नाईक, राहुल शिरे यांनी केली.

Web Title: Vehicle thief arrested by Unit 2 of Crime Branch In Nagpur