शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
4
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
5
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
6
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
7
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
8
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
9
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
10
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
11
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
12
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
13
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
14
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
15
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
16
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
17
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
18
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
19
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
20
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन

उपराजधानीत भाज्या कडाडल्या; कोथिंबीर @३००

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 12:20 IST

गेल्या काही दिवसांपासून नागपुरात कोथिंबीर २०० रुपये किलो विकले जात असतानाच रविवारी अचानक वाढ होऊन कॉटन मार्केट ठोक बाजारात ३०० तर किरकोळमध्ये ३५० रुपयांपेक्षा जास्त भाव होते.

ठळक मुद्देपावसामुळे भाज्या महाग स्थानिक व बाहेरून आवक कमी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पावसामुळे कोथिंबीरचे बहुतांश पीक खराब झाले असून आवक फारच कमी आहे. नाशिक, नांदेड आणि छिंदवाडा येथून आवक बंद आहे. गेल्या काही दिवसांपासून नागपुरात कोथिंबीर २०० रुपये किलो विकले जात असतानाच रविवारी अचानक वाढ होऊन कॉटन मार्केट ठोक बाजारात ३०० तर किरकोळमध्ये ३५० रुपयांपेक्षा जास्त भाव होते. सर्वाधिक भाव असतानाही ग्राहकांनी खरेदी केल्याची माहिती महात्मा फुले बाजार अडतिया असोसिएशनचे सचिव राम महाजन यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.हिरव्या पालेभाज्यांची आवक कमी असली तरी पालक मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. रविवारी ठोकमध्ये १० रुपये तर किरकोळमध्ये २० रुपये भाव होते. याशिवाय मेथी पंढरपूर येथून येत असून ठोकमध्ये दर्जानुसार ८० ते १०० रुपये तर चवळी भाजी ३० रुपये किलो विकल्या गेली.पंजाब, दिल्लीतून आवकस्थानिक शेतकऱ्यांकडून हिरवी मिरचीची आवक बंद असून दिल्ली, पंजाब आणि जमशेदपूर येथून सुरू आहे. ठोकमध्ये ४० ते ५० रुपये भाव असून किरकोळमध्ये ६० ते ८० रुपये आहेत.रविवारी किरकोळ बाजारातील भावकोथिंबीर ३५० रुपये, हिरवी मिरची ६० ते ८०, टमाटर ४०, फूलकोबी ४०, पत्ताकोबी ४०, वांगे ४०, कारले ८०, ढेमस ५०, भेंडी ५०, चवळी शेंग ६०, गवार ६०, लवकी ३०, कोहळे ४०, सिमला मिरची ८०, तोंडले ४०, परवळ ७०, मेथी १२०, पालक २०, चवळी भाजी ४०, काकडी ३०, गाजर ४०, मुळा ४०, कैरी ८०, फणस ५० रुपये.स्थानिक शेतकऱ्यांकडून फुलकोबी, कारले, वांगे, भेंडीनागपूर जिल्ह्याच्या २५ ते ३० कि़मी.च्या अंतरावरून फूलकोबी, ढेमस, वांगे, टमाटर, मोहाडहून कारले, मौद्याहून भेंडी, तुमसर व मौदा येथून चवळी व गवार शेंग, कळमेश्वर व सावनेरहून पालक व चवळी भाजी तर मदनपल्लीहून पत्ताकोबी, राजनांदगाव येथून लवकी, यवतमाळ व जळगावहून कोहळे, रायपूरहून सिमला मिरची, रायपूर, भिलाई, दुर्ग येथून तोंडले व परवळ, ओरिसा राज्यातून फणस, रायपूर येथून सिमला मिरची आणि देशाच्या अन्य भागातून काकडी, गाजर, मुळा, कैरी आदींची आवक आहे. कॉटन मार्केटमध्ये सरासरी लहान-मोठ्या ७० ते ८० गाड्या येत असल्याचे महाजन यांनी सांगितले.कांदे व बटाट्याची विक्री कमीकळमना कांदे, बटाटे अडतिया असोसिएशनचे माजी अध्यक्ष जयप्रकाश वसानी म्हणाले, कांद्याची आवक चांगली असून विक्री कमी आहे. त्यानंतरही भाव वाढले आहेत. कळमना ठोक बाजारात भाव २० रुपये किलो, पण किरकोळमध्ये ३० ते ४० रुपये भाव आहेत. कळमन्यात पांढरे आणि लाल कांद्यांचे भाव ७०० ते ८०० रुपये मण (एक मण ४० किलो) आहेत. पांढरे कांदे अमरावती आणि अकोला येथे येतात. भाव परवडत नसल्यामुळे गुजरातेतून आवक बंद आहे. दररोज ८ ते १० ट्रक (एक ट्रक १० टन) येत आहेत. लाल कांद्याला जास्त मागणी असते. सध्या चाळीसगाव, बुलडाणा (शेगाव, खामगाव), मध्य प्रदेशातील सागर व रायसेन जिल्ह्यातून आवक आहे. दररोज १५ ते २० ट्रक (एक ट्रक १२ टन) कळमन्यात येत आहेत. पांढºया आणि लाल कांद्याचे पीक मार्चमध्ये आले. उन्हाळी कांदा साठवून ठेवता येतो. शेतकरी गरजेनुसार बाजारात विक्रीसाठी आणतात. लासलगाव, पिंपळगाव येथील दर्जेदार लाल कांदा पॅकिंगमध्ये मलेशिया आणि बांगलादेशात निर्यात करण्यात येत असल्याचे वसानी म्हणाले.बटाट्याचे भाव स्थिरयंदा उत्पादन जास्त झाल्यामुळे दोन महिन्यांपासून बटाट्याचे भाव स्थिर आहेत. मार्चमध्ये नवीन उत्पादन निघाले तेव्हा भाव दर्जानुसार ५०० ते ६०० रुपये मण होते. जास्त भाव मिळण्याच्या अपेक्षेने शेतकºयांनी माल कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवला. पण मागणी कमी झाल्यानंतर शेतकºयांनी विक्रीस काढला. सध्या कळमन्यात ३५० ते ४०० रुपये मण भाव आहेत. दररोज २० ते २५ ट्रक (एक ट्रक १५ ते २० टन) बटाटे उत्तर प्रदेशातील आग्रा, इटावा, सिरसागंज येथून येत आहेत. सणासुदीत भाव वाढण्याची शक्यता आहे.

टॅग्स :vegetableभाज्या