नागपुरात भाजीविक्रेत्याने केली गळफास लावून आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 00:59 IST2020-07-14T00:57:49+5:302020-07-14T00:59:02+5:30
विविध भागात भाजी विकून उदरनिर्वाह करणाऱ्या एका व्यक्तीने आर्थिक कोंडीमुळे गळफास लावून आत्महत्या केली. विष्णू संपत सावरकर (वय ३३) असे मृताचे नाव आहे.

नागपुरात भाजीविक्रेत्याने केली गळफास लावून आत्महत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विविध भागात भाजी विकून उदरनिर्वाह करणाऱ्या एका व्यक्तीने आर्थिक कोंडीमुळे गळफास लावून आत्महत्या केली. विष्णू संपत सावरकर (वय ३३) असे मृताचे नाव आहे. नंदनवनमधील स्वातंत्र्य नगरातील गल्ली नंबर पाचमध्ये सावरकर राहत होता. तो विविध भागात हातठेल्यावर भाजी विकत होता. भाजीची चांगली विक्री होत नसल्याने त्यांची आर्थिक कोंडी झाली होती. मनासारखे उत्पन्न मिळत नसल्याने त्याची मानसिक अवस्था खराब झाली होती. त्यामुळे त्याने गळफास लावून घेतला. सोमवारी पहाटे ही घटना उघडकीस आली. विष्णूची पत्नी सुनीता सावरकर हिने दिलेल्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.