नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथे मुख्यअधिकाऱ्यावर भाजी विक्रेत्याने केला हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 13:23 IST2020-06-20T13:23:23+5:302020-06-20T13:23:57+5:30

सावनेर परिसरात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रभाव वाढत आहे. येथील महावितरणमधील एक कर्मचारी कोरोनाबाधित झाल्याची वार्ता आली. त्याच्यामुळे इतरांना बाधा होऊ नये याकरिता प्रशासन अधिक सक्रीय झाले.

A vegetable seller attacked the chief officer at Savner in Nagpur district | नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथे मुख्यअधिकाऱ्यावर भाजी विक्रेत्याने केला हल्ला

नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथे मुख्यअधिकाऱ्यावर भाजी विक्रेत्याने केला हल्ला


लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: सावनेर शहरातील मुख्य रस्त्यावर भाजी विकत असलेल्या विक्रेत्याला हटविण्याचा प्रयत्न केला असता त्याने अधिकाऱ्यांवरच हल्ला चढविल्याची घटना सावनेर येथे घडली.
सावनेर परिसरात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रभाव वाढत आहे. येथील महावितरणमधील एक कर्मचारी कोरोनाबाधित झाल्याची वार्ता आली. हा व्यक्ती येथील किराणा व्यापाऱ्याचा जावई आहे. त्याच्यामुळे इतरांना बाधा होऊ नये याकरिता प्रशासन अधिक सक्रीय झाले. शनिवारी सकाळी मुख्य अधिकारी रविंद्र भलावी यांनी गांधी चौकातील एका भाजीविक्रेत्याला रस्त्यावर लावलेली भाजीची गाडी काढायला सांगितले व सक्तीने कारवाई केली. भलावी हे नंतर नगरपरिषदेकडे जाण्यास निघाले असता या भाजीवाल्याने भलावी यांच्यावरच हल्ला चढवला. या घटनेमुळे काही काळ येथे तणावाची स्थिती निर्माण झाली होती.

Web Title: A vegetable seller attacked the chief officer at Savner in Nagpur district