शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
2
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
3
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
4
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
5
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
6
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
7
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
8
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
9
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
10
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
11
ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने चव्हाण कुटुंबाचा 'आधार' गेला; क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू
12
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
13
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
14
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
15
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
16
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
17
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
18
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
20
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
Daily Top 2Weekly Top 5

भाज्यांच्या किमती घसरल्या

By admin | Updated: November 17, 2014 00:54 IST

सध्या किरकोळ आणि ठोक बाजारात स्थानिक उत्पादकांकडून भाज्यांची आवक वाढल्याने भाव आधीच्या तुलनेत कमी आहेत. गृहिणींचे महिन्याचे बजेट आटोक्यात आहे. एकंदरीत पाहता किमती घसरल्याने

स्थानिकांची आवक वाढली : सामान्यांच्या आटोक्यातनागपूर : सध्या किरकोळ आणि ठोक बाजारात स्थानिक उत्पादकांकडून भाज्यांची आवक वाढल्याने भाव आधीच्या तुलनेत कमी आहेत. गृहिणींचे महिन्याचे बजेट आटोक्यात आहे. एकंदरीत पाहता किमती घसरल्याने भाज्या चविष्ट झाल्याची गृहिणींची प्रतिक्रिया आहे. किरकोळमध्ये काही भाज्या महागचठोकमध्ये असलेल्या भावापेक्षा किरकोळमध्ये भाज्यांच्या किमती दुप्पट असतात, असा नेहमीच अनुभव आहे. हिरवी मिरची, सांबार, गाजर, भेंडी, कारले जास्त किमतीत विकल्या जात आहे. सामान्यांना हवी असलेली फुल कोबी, पत्ता कोबी, पालक, मेथी, वांगे स्वस्तात आहेत. सिंचनाच्या सोयी वाढल्यानागपूरपासून ३० ते ४० कि़मी. परिसरात सिंचनाच्या सोयी मोठ्या प्रमाणात झाल्याने भाज्यांचे उत्पादन वाढले आहे. सध्या ढगाळ वातावरणामुळे सात दिवसानंतर येणारे पीक आधीच आले आहे. तसे पाहता मे, जूनमध्ये भाज्यांची लागवड होते आणि दसऱ्याला भाज्या बाजारात येतात. पण मध्यंतरी आलेल्या पावसामुळे लागवड मोठ्या प्रमाणात झाली. ते पीक आता बाजारात येत आहे.गेल्यावर्षी भाज्यांना जास्त भाव मिळाल्याने यंदा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लागवड केली. परिणामी उत्पादनही वाढल्याने भाव कमी आहेत. यंदा भाज्यांची स्वस्ताई फेब्रुवारीपर्यंत राहील, अशी माहिती महात्मा फुले भाजी बाजार अडतिया असोसिएशनचे सचिव राम महाजन यांनी लोकमतला दिली.फुल कोबी व पालक स्वस्तगेल्या काही दिवसांपासूनच्या ढगाळ वातावरणामुळे भाज्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात आले आहे. ठोक बाजारात भाव मिळत नसल्याने, शिवाय इतर कमिशनला कात्री लावण्याच्या उद्देशाने उत्पादक रस्त्याच्या कडेला मेटॅडोर लावून भाज्या विक्री करीत असल्याचे चित्र सक्करदरा चौक आणि ग्रेट नाग रोडवर दिसत आहे. याशिवाय उमरेड मार्गावरही अनेक उत्पादन भाज्याची विक्री करीत असल्याचे दिसून आले. फुल कोबी, पत्ता कोबी, पालक, मुळा आदींची विक्री सुरू आहे. कॉटन मार्केट आणि कळमना ठोक बाजारात टमाटर नारायणगाव, मगनफल्ली, संगमनेर व नाशिकहून येत आहे. गोंदिया आणि भंडाऱ्यातून भेंडी, छिंदवाडा व औरंगाबाद येथून फुलकोबी आणि परतवाडा, जगदलपूर, रायपूर येथून हिरवी मिरची तर छिंदवाडा व नांदेड येथून सांबार येत आहे.स्थानिक उत्पादकांकडून चवळी भाजी, पालक, भेंडी, हिरवी मिरची, सांबार, पत्ता कोबी आणि फूल कोबीची आवक आहे. कॉटन मार्केट बाजारात दररोज २०० गाड्यांची आवक आहे. (प्रतिनिधी)