वसुमना पंत चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी; अंकित मनपाचे नवे अतिरिक्त आयुक्त
By गणेश हुड | Updated: April 2, 2026 20:29 IST2026-04-02T20:28:37+5:302026-04-02T20:29:40+5:30
Nagpur : नागपूर महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत यांची चंद्रपूरच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. वसुमना पंत चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्याकडून पदाचा कार्यभार स्विकारणार आहेत.

Vasumana Pant is the District Collector of Chandrapur; Ankit is the new Additional Commissioner of Municipal Corporation.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत यांची चंद्रपूरच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. वसुमना पंत चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्याकडून पदाचा कार्यभार स्विकारणार आहेत. तर मनपाच्या अतिरिक्त आयुक्तपदी छत्रपती संभाजीगर जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अंकित यांची नियुक्ती करण्यात आली आहे
वसुमना पंत अतिरिक्त आयुक्त (शहर) म्हणून कार्यरत असताना त्यांच्याकडे शहर स्वच्छता, आरोग्य, घनकचरा व्यवस्थापन आणि नागरिक सेवा सुधारणे अशी जबाबदारी होती. त्यांनी शहरात 'डीप क्लीनिंग' मोहीम, इको-फ्रेंडली गणपती उत्सव आणि आरोग्य जागृती उपक्रमांचे यशस्वीपणे राबविले.